आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या दिवशी विधानसभेच्या प्रचारात उतरले तारे जमीन पर!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. यानंतर कोणालाही जाहीरपणे प्रचार करता येणार नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांच्या प्रचारासाठी सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली. यात दाक्षिणात्य सिनेमातील तेलुगु अभिनेते ब्ब्रह्मानंदम, बॉलिवडू अभिनेता गोविंदा, अभिनेत्री स्नेहा उलाल तसेच सलमान खानचा बॉगीगार्ड शेरा यांचा समावेश होता. 
 

कोणता सेलिब्रिटी कोणाच्या प्रचारासाठी आला होता जाणून घ्या 
> सोलापुरात शनिवारी चित्रपट अभिनेत्री स्नेहा उलालने शिवसेनेचे बंडखोर उमेदवार महेश काेठे यांच्या प्रचारात हजेरी लावली.
> मलकापुरात भाजपचे उमेदवार चैनसुख संचेतींच्या प्रचारफेरीत अभिनेता गोविंदाची उपस्थिती होती.
> सोलापुरात शनिवारी प्रख्यात तेलगू विनोदी अभिनेते ब्रह्मानंदम यांनीही एका अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात सहभाग घेतला. 
> सलमान खानचा ‘बॉडीगार्ड’ शेराने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आदित्य यांच्या रॅलीत हजेरी लावली.