आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Celebrities Reaction On Bollywood Actress Zaira Waseem's Decision To Quit Bollywood, Her Fans Are Upset

अभिनेत्री जायरा वसीमच्या सिनेसृष्टी सोडण्याच्या निर्णयामुळे चाहते नाराज, तर बॉलिवूडमध्ये उमटल्या संमिश्र प्रतिक्रिया 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'दंगल गर्ल' म्हणून ओळख असणाऱ्या अभिनेत्री जायरा वसीमने अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय सर्वांना सांगितला आहे. तिच्या या निर्णयाने तिचे फॅन्स तर नक्कीच दुखावले गेले आहेत. मात्र सिनेसृष्टीतही टिपूच्या निर्णयामुळे खूप मोठा गदारोळ झाला आहे. काहींनी तिच्या निर्णयाचे समर्थन केले तर काहींनी तिचा हा निर्णय मूर्खपणा असल्याचे सांगितले. 

 

पाहुयात सेलिब्रिटींनी तिच्या विषयी काय लिहिले... 
रवीना टंडन... 

अभिनेत्री रवीना टंडनने आपल्या ट्विटर अकाउंटवर रविवारी लिहिले, ''याने काहीही फरक पडत नाही की, केवळ दोन चित्रओपात करणारी लोक बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी कृतज्ञता व्यक्त करत नाहीत. ज्याने त्यांना सर्वकाही दिले. चांगले झाले असते जर तिने सन्मानाने इंडस्ट्री सोडली असती आणि आपले रिग्रेसिव विचार आपल्याकडेच ठेवले असते.'' पुढे तिने लिहिले, ''मी इंडस्ट्रीसोबत उभी आहे जिने प्रत्येकाला संधी दिली आहे. ती सोडणे तुमचा निर्णय आहे पण इतर लोकांसाठी तिला नीच सिद्ध करू नका. या इंडस्ट्रीमध्ये कोणताही भेदभाव नाही, येथे प्रत्येक धर्म, जाती आणि प्रत्येक ठिकाणाहू आलेले लोक खांद्याला खांदा लावून काम करतात.''

 

 

इकबाल खान... 
अभिनेता इकबाल खानने लिहिले, ''जायरा वसीमला अभिनय सोडायचा आहे यामध्ये मोठी गोष्ट काय आहे, तो तिचा निर्णय आहे. कदाचित ती जे करत होती ते चुकीचे असेल आणि तिला ते करायचे नाही. मी एक अभिनेता आहे, मी काही चुकीचे करत नाही आणि हे सर्व मला माझ्या धर्माचे  करण्यापासून रोखत नाही.''

 

 

तसलीमा नसरीन... 
लेखिका तसलीमा नसरीनने जयराचा हा निर्णय मूर्खपणा असल्याचे सांगितले, तिने ट्विटरवर लिहिले, ''OMG! बॉलिवूडची टॅलेंटेड अभिनेत्री जायरा वसीम आता अभिनय सोडू इच्छिते कारण तिला वाटते की, तिचे काम तिला तिचा धर्म आणि अल्लाहपासून दूर करत आहे. किती मूर्खपणा आहे हा. मुस्लिम समुदायामध्ये खूप अशा टॅलेंटेड लोकांना दबावामुळे बुरख्याच्या अंधारात नाईलाजाने जावे लागते."

 

 

तारिक फतेह... 
लेखक तारिक फतेहनेदेखील जायराच्या निर्णयावर केला प्रश्न. त्यांनी एक बातमी कोट करून ट्विटरवर लिहिले, "दंगल स्टार जायरा वसीमने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिचे म्हणणे आहे की, यामुळे इस्लामला धोका आहे. आता जयरा पुढे काय करेल, बुरखा की नकाब ?"

 

 

वीना मलिक... 
पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिकनेदेखील जायरा वसीमचे समर्थन केले. तिने ट्विटरवे लिहिले, ''हे अभिव्यक्ती स्वतंत्र्य आहे. बॉलिवूडमध्ये आधीच पॉप्युलर राहणे आणि आणि एक नवी संधी मिळत असताना इंडस्ट्री सोडण्याच्या तुझ्या निर्णयाचा मी सन्मान करते. तुझा प्रवास खूप छान होता आणि तू जो निर्णय घेतला आहेस, मी त्यासाठी तुझे कौतुक करते. हे सोपे नाहीये.''

बातम्या आणखी आहेत...