आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Celebrity Reached London Lord's Cricket Ground For Indian Cricketers, Celebrity And Kapil Dev Shared Selfie

लंडन : भारतीय क्रिकेटर्ससाठी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर पोहोचले सेलिब्रिटी, कपिल देव यांच्यासोबतच सेल्फी केला शेअर 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : वर्ल्ड कप सुरु व्हायला काहीच दिवस बाकी आहेत. वर्ल्ड कपसाठी सर्वचजण खूप उत्साहित आहेत. भारतीय क्रिकेटर्सचा उत्साह वाढवण्यासाठी बॉलिवूड स्टार्स लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर पोहोचले. शनिवारी लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर एका कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. जेथे अदिती राव हैदरी, डायना पेंटी, राजकुमार राव आणि पत्रलेखा हेदेखील आहेत.  

 

सेलेब्रिटींसोबत दिसले कपिल देव... 
अदिती राव हैदरीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक सेल्फी पोस्ट केली. या फोटोमध्ये अदितीसोबत डायना, राजकुमार, पत्रलेखा आणि कपिल देव दिसत आहेत. अदितीने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'ज्यांनी 1983 मध्ये भारतीय क्रिकेटचा एक इतिहास रचला. लिजंड कपिल देवसोबत फॅन गर्ल्स आणि बॉईज त्याच ऐतिहासिक जागेवर उभे होते.' 

 

अदिती राव हैदरीची इंस्टा पोस्ट... 

 

 

या फोटोवर रणवीर सिंहनेदेखील कमेंट केले, जो फिल्म '83' मध्ये कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. रणवीरने आपल्या कमेंटमध्ये लिहिले, 'लव्ह इट !!!'

 

भारतीय क्रिकेटर्सचा उत्साह वाढवण्यासाठी पोहोचले... 
या सेल्फीव्यतिरिक्त अदितीने आणखी एक सेल्फी शेयर केला, ज्यामध्ये चारही कलाकार दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अदितीने लिहिले, 'वर्ल्ड कपच्या ठीक आधी आमच्या निळ्या जर्सीवाल्या मुलांच्या सपोर्टसाठी. क्रिकेटचे घर लॉर्ड्समध्ये खेळाचा ज्वर चढू लागला आहे.'   

 

अदिती राव हैदरीची इंस्टाग्राम पोस्ट... 

बातम्या आणखी आहेत...