Home | Maharashtra | Mumbai | Celebs earning cottage and jewelery for everything they earn

काेट्यवधींची कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींना कपडे, दागिने सर्वकाही मिळते अगदी माेफत

प्रतिनिधी | Update - Nov 10, 2018, 09:58 AM IST

दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान कलाकारांमध्ये सुरू अाहे साेर्सिंगचा ट्रेंड

 • Celebs earning cottage and jewelery for everything they earn

  मुंबई - दीपिका पदुकाेन व रणवीर सिंहच्या विवाहासाेबत त्यांचे कपडे, दागिने, व्हेन्यू अादीचीही चर्चा सुरू अाहे. वैयक्तिक असाे की व्यावसायिक कार्यक्रम, या सेलिब्रिटींकडे राेजच नवे व महागडे कपडे, दागिने अादी कसे काय दिसतात? हा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर अाहे-सेलिब्रिटींना या वस्तू जवळपास फुकटच मिळत असतात. बहुतांश कार्यक्रमात त्या दिसून येतात. म्हणजे, माेठमाेठे ब्रॅण्ड्स स्वत:च सेलिब्रिटींशी संपर्क साधून त्यांना महागडी उत्पादने देतात. त्यामुळे सेलिब्रिटीही कपडे, दागिने अादी वस्तू खरेदी किंवा भाड्याने घेण्याएेवजी साेर्सिंगला जास्त महत्त्व देत अाहेत.

  - साेनम कपूरच्या लग्नात सजावटीसाठी लावलेल्या मेणबत्त्यांची किंमत ७ हजार प्रतिमेणबत्तीप्रमाणे हाेती. या मेणबत्त्या लंडनच्या ‘ला मलाेने’ या कंपनीने पुरवल्या हाेत्या, असे सांगण्यात येतेय. संबंधित ब्रँडने भारतात या उत्पादनाचा प्रचार करण्यासाठी असे केले हाेते.


  - बिपाशा बासू व करणसिंह ग्राेव्हरच्या लग्नाचा मेंदी कार्यक्रम ‘व्हिला-६९’ नावाच्या लाउंजमध्ये झाला हाेता. सूत्रांनुसार या नुकत्याच तयार झालेल्या लाउंजला प्रचाराची गरज हाेती. त्यामुळे मीडिया कव्हरेजसाठी त्याच्या मालकाने संंबंधित कार्यक्रमासाठी हा लाउंज माेफत उपलब्ध करून दिला हाेता.
  - भारती सिंहने तिच्या लग्नाचे अनेक व्हिडिअाे शेअर केले हाेते. त्यात तिने एका ब्रँडचे दागिने व कपडे घातल्याचे दिसून अाले. भारतीने तिच्या चाहत्यांमध्ये संबंधित ब्रॅण्डच्या प्रचारासाठी असे केले हाेते व या बदल्यात कंपनीने एक रुपयाही घेतला नसल्याचे वृत्त अाहे.


  - सानिया मिर्झाने तिच्या गर्भावस्थेतील विविध ब्रॅण्डची उत्पादने घातलेले व्हिडिअाे साेशल मीडियावर शेअर केले.यासह अन्य सेलेब्रिटीजही अशा प्रकारे प्रचार करताना दिसतात.{ शाहिद कपूर व मीरा राजपूत यांच्या निकटवर्तीयांच्या मते,मीराने दागिने खरेदी केले नव्हते ना भाड्याने घेतले हाेते. हे दागिने नीरव माेदीच्या कंपनीने पुरवले . नंतर ते खरेदी केले.

Trending