Home | Gossip | Celebs not made career what they dreamed

बालपणीचे स्वप्न राहिले अपूर्ण, भलत्याच करिअरमध्ये या सेलेब्सना मिळाले यश

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 12:23 PM IST

या सेलिब्रिटींना दुसऱ्याच क्षेत्रात यश मिळाले आणि त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली.

 • Celebs not made career what they dreamed

  अनेक लोक बालपणीच ठरवत असतात की, त्यांना मोठे झाल्यावर काय करायचे आहे किंवा कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. पण जर नशिबात भलतेच काहीतरी लिहिलेले असेल तर काय करणार. अनेक सेलिब्रिटींबाबत असेच काहीतरी घडले आहे. त्यात परिणिती चोप्रा, स्मृती इराणी, महेंद्रसिंह धोनी यांच्यासह असे अनेक सेलिब्रिटी आहेत. प्रत्येक क्षेत्रात अशी अनेक नावे आहेत, ज्यांना बालपणी वेगळेच काहीतरी व्हायचे होते, पण त्यांना दुसऱ्याच क्षेत्रात यश मिळाले आणि त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली.

  परिणिती चोप्रा
  परिणीति चोप्रा आघाडीच्या अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. पण तिने कधीही या क्षेत्रात येण्याचा विचारही केला नव्हता. चित्रपट क्षेत्राशी कीहीह संबंध नसल्याने ती बँकिंग क्षेत्रात जाण्याच्या विचारात होती. 2009 मध्ये शिक्षण पूर्ण करून ती भारतात परतली. यशराज फिल्म्समध्ये तिने पब्लिक रिलेशन्स कन्सल्टंट म्हणून जॉइन केले. काही दिवसांनी तिच्याकडे चित्रपटाच्या ऑफर्स आल्या आणि तिने याच बॅनरबरोबर 3 चित्रपटांचे कॉन्ट्रॅक्ट साईन केले. 2011 मध्ये परिणितीचा पहिला चित्रपट 'लेडीज वर्सेस रिकी बहल' रिलीज झाला होता.


  महेंद्र सिंह धोनी
  महेंद्र सिंह धोनी भारतीय टीमचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेला आहे. किक्रेटमध्ये मोठी ओळख निर्माण करणारा धोनी हा शालेय दिवसांत फुटबॉल खेळायचा आणि त्यातही तो गोलकिपर होता. क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी तो खरगपूरच्या एका क्लबतर्फे खेळलाही होता. पण त्याच्या नशिबात कदाचित क्रिकेटर बनणेच लिहिलेले होते.

  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या अशाच काही सेलिब्रिटींबाबत..

 • Celebs not made career what they dreamed

  नीता अंबानी 
  रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी यांना टिचर व्हायचे होते. पण मुकेश अंबानी यांच्याशी लग्न आणि जबाबदारीमुले त्यांना ते स्वप्न पूर्ण करता आले नाही. पण 2003 मध्ये त्यांनी धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलचा पाया रोवला आणि त्याच्या चेअरपर्सन बनल्या. 

 • Celebs not made career what they dreamed

  राजीव गांधी
  राजीव गांधी देशाच्या सर्वात यशस्वी पंतप्रधानांपैकी एक असलेले नेते होते. पण त्यांना कधीही राजकारणात येण्याची इच्छा नव्हती. ते पायलट होते आणि त्यांना कायम याच क्षेत्रात करिअर करायचे होते. 1980 मध्ये त्यांचा भाऊ संजय गांधी यांचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांनी शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांच्या सल्ल्यावरून राजकारणात प्रवेश केला. 

 • Celebs not made career what they dreamed

  अनुष्का शर्मा
  अनुष्का शर्माला सुरुवातीपासून सुपर मॉडेल बनायचे होते. तिने करिअरची सुरुवातही मॉडेलिंगद्वारे केली. पण शाहरुख खानसारख्या सुपरस्टारबरोबर चित्रपट मिळाल्याने तिने अॅक्ट्रेस बनण्याचा निर्णय घेतला. 

 • Celebs not made career what they dreamed

  विशाल करवाल 
  '1920 लंदन' मधून बॉलीवूड डेब्यू करणारा अॅक्टर विशाल करवालला पायलट बनायचे होते. पण नशिबाने त्याला अॅक्टर बनवले. एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, आजही तो फ्लाइंगला मिस करतो. 

 • Celebs not made career what they dreamed

  स्मृती इराणी
  स्मृती इराणी लहानपणापासून मीडिया फिल्डमध्ये जाण्यास इच्छुक होत्या. पण त्यांनी पत्रकार बनावे हे त्यांच्या वडिलांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी ब्युटी प्रोडक्टची मार्केटींग केली. त्यावेळी कोणीतरी मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. पण त्यात यश मिळाले नाही. त्यांना एअर होस्टेसची नोकरीही नाकारली गेली.  पैसे मिळवण्यासाठी त्यांनी रेस्तरॉमध्येही काम केले. त्यानंतर अॅक्टींगची संधी मिळाली आणि पुढे काय झाले ते सर्वांनाच माहिती आहे. सध्या त्या केंद्रीय मंत्री आहेत. 

Trending