Home | Gossip | Celebs Remarried After Divorce While Ex Wives Stayed Single

घटस्फोटानंतर या सेलिब्रिटींनी थाटले दुसरे लग्न, Ex Wives मात्र आजही आहेत सिंगल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 01:02 PM IST

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोट देऊन दुसरा संसार थाटला.

 • Celebs Remarried After Divorce While Ex Wives Stayed Single
  आमिर खान-किरण राव आणि करीना कपूर- सैफ अली खान. इनसेटमध्ये रीना दत्त आणि अमृता सिंह

  एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोट देऊन दुसरा संसार थाटला. पण ज्यांना या सेलिब्रिटींनी घटस्फोट दिला, त्या मात्र आजही सिंगल आहेत. असाच एक अभिनेता म्हणजे आमिर खान. येत्या 8 नोव्हेंबर रोजी आमिरचा ठग्ज ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आमिर खानने 1986 साली रीना दत्तसोबत लग्न केले होते.


  लग्नाच्या 16 वर्षांनी झाले विभक्त....
  आमिर खान आणि रीना दत्त यांचे लग्न 16 वर्षे टिकले. 2000 साली दोघांचा घटस्फोट झाला. या दाम्पत्याला जुनैद आणि इरा ही दोन मुले आहेत. रीनापासून घटस्फोट घेतल्यानंतर आमिरने 2005 साली किरण रावसोबत दुसरा संसार थाटला. या दोघांचा एक मुलगा असून आझाद राव हे त्याचे नाव आहे. आमिरने तर दुसरे लग्न थाटले, मात्र रीना आजही सिंगल असून दोन्ही मुलांची कस्टडी तिच्याकड आहे.


  तर अभिनेता सैफ अली खानच्या नावाचासुद्धा या यादीत समावेश होतो. अभिनेत्री अमृता सिंहसोबत 1991 साली सैफने लग्न थाटले होते. या दोघांना सारा ही मुलगी आणि इब्राहिम हा एक मुलगा आहे. 13 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर 2012 साली सैफने अभिनेत्री करीना कपूरसोबत दुसरे लग्न केले. पण अमृता मात्र आजही सिंगल असून दोन्ही मुलांसोबत राहते.

  पुढील स्लाईड्सवर वाचा, अशाच आणखी काही सेलिब्रिटींविषयी...

 • Celebs Remarried After Divorce While Ex Wives Stayed Single
  फोटो- अनुराग कश्यप, कल्की कोचलिन. इनसेटमध्ये आरती बजाज

  डायरेक्टर अनुराग कश्यपने 2003 मध्ये आरती बजाजसोबत लग्न केले होते. या दोघांची आलिया ही एक मुलगी आहे. दोघांचा 2009 साली घटस्फोट झाला. अनुरागपासून विभक्त झाल्यानंतर आरती बजाजने अद्याप लग्न केलेले नाही. तर अनुरागने मात्र अभिनेत्री कल्कि कोचलिनसोबत दुसरा संसार थाटला. पण आता कल्किपासून अनुराग विभक्त झाला आहे.  

   

 • Celebs Remarried After Divorce While Ex Wives Stayed Single
  फोटो- शबाना आझमी, जावेद अख्तर. इनसेटमध्ये हनी ईराणी

  जावेद अख्तर यांनी 1972 साली हनी ईराणीसोबत लग्न केले होते. फरहान अख्तर आणि झोया अख्तर ही या दोघांची मुले आहेत. लग्नानंतर सहा वर्षे एकत्र राहिल्यानंतर जावेद अख्तर यांनी हनी ईराणी यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि 1978 साली दोघे विभक्त झाले. हनी यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर जावेद अख्तर यांनी 1985 मध्ये अभिनेत्री शबाना आझमीसोबत दुसरे लग्न केले. जावेद यांनी दुसरा संसार थाटला, हनी यांनी मात्र पुन्हा लग्न केले नाही.  

   

 • Celebs Remarried After Divorce While Ex Wives Stayed Single
  फोटो- कबीर बेदी, परवीन दुसांज. इनसेटमध्ये निकी

  अभिनेते कबीर बेदी यांचे पहिले लग्न 1969 साली प्रोतिमा बेदी यांच्यासोबत झाले होते. या दोघांची पूजा बेदी आणि सिद्धार्थ ही दोन मुले होती. सिद्धार्थने वयाच्या 26 व्या वर्षी आत्महत्या केली होती. प्रोतिमा बेदीसुद्धा आता या जगात नाहीत. कबीर यांनी ब्रिटीश फॅशन डिझायनर सुजानसोबत दुसरे लग्न थाटले. या लग्नापासून कबीर यांना एक मुलगा असून अदम हे त्याचे नाव आहे. अदम व्यवसायाने मॉडेल आहे. कबीर बेदी यांचे हे दुसरे लग्न फार काळ टिकले नाही आणि 1992 साली कबीर यांनी ब्रिटीश टीव्ही पर्सनॅलिटी निकी मूलगाओकरसोबत तिसरा संसार थाटला. 13 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2005 साली दोघांचा घटस्फोट झाला. 2016 मध्ये कबीर यांनी परवीन दुसांजसोबत चौथे लग्न केले, तर निकी मात्र अद्याप सिंगल आहे.  

   

 • Celebs Remarried After Divorce While Ex Wives Stayed Single
  फोटो- बिपाशा बासु, करण सिंह ग्रोवर. इनसेटमध्ये जेनिफर विंगेट

  करण सिंह ग्रोवरने 2012 मध्ये जेनिफर विंगेटसोबत दुसरे लग्न केले होते. पण 2016 साली दोघे विभक्त झाले. जेनिफरपासून विभक्त झाल्यानंतर त्याचवर्षी करणने अभिनेत्री बिपाशा बसूसोबत तिसरे लग्न करुन पुन्हा एकदा संसाराला सुरुवात केली. तर दुसरीकडे मात्र जेनिफर सिंगल आहेत. 

   

Trending