सेलचा एफपीओ येतोय / सेलचा एफपीओ येतोय

May 19,2011 05:08:53 PM IST

सेल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचा 8,000 कोटींचा बहुप्रतीक्षित एफपीओ लवकरच जाहीर होत आहे. कंपनीची फॉलो ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) येत्या 14 च्या जवळपास जाहीर होण्याची शक्यता आहे. स्टील क्षेत्रातील ही दिग्गज कंपनी तिच्या प्रस्तावित एफपीओसाठी सेबीसमोर या महिन्याच्या अखेरीपर्यंत प्रॉस्पेक्टस सादर करणार आहे.

या एफपीओसाठी रेड हेरींग प्रॉस्पेक्टस चालू महिन्याच्या अखेरीपर्यंत सेबी समोर सादर केले जाईल; पण निश्चित तारीख अजून ठरलेली नाही असे सेलचे प्रवक्ते आर. के. सिंघल यांनी सांगितले. 23 मे रोजी कंपनीच्या मंडळाची बैठक होईल आणि त्यात रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सादर करण्याच्या तसेच एफपीओ जाहीर करण्याच्या तारखा ठरविण्यात येतील. जूनच्या प्रारंभास सेलचा एफपीओ जाहीर होऊ शकतो असे सेलचे अध्यक्ष सी. एस. वर्मा यांनी मागील महिन्यात म्हटले होते.

X