आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Censor Board Announces Geeta Quran Scenes Should Be Deleted From Film 'India's Most Wanted'

बॉलिवूड : सेंसर बोर्डाने दिला चित्रपट 'इंडियाज मोस्ट वाॅन्टेड' मधून गीता-कुरान यांच्याशी निगडित सीन हटवण्याचा आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अजय देवगणचा चित्रपट 'दे दे प्यार दे'मध्ये एका सीनमधून दारूची बॉटल हटवून त्याजागी बुके ठेवणे आणि डायलॉग्स कापल्यानंतर सेंसर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने अर्जुन कपूरची फिल्म 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' मध्येही एडिटिंग कारण्याचा आदेश दिला आहे. फिल्म 24 मेला रिलीज होणार आहे.  

 

बोर्डाने चित्रपटातून काही खास दृशे हटवण्याच्या मागणी केली आहे. ज्यामध्ये भगवान कृष्ण, गीता आणि कुरानला विशेषपद्धतीने जोडले गेले आहे. वेबसाइट कोईमोईनुसार, बोर्डाचे म्हणणे आहे की, यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. मात्र ट्रेलर रिलीज झाल्यानंतर काही लोकांनी याच मुद्यामुळे आपत्ती दर्शविली होती. त्यानंतर बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.  

 

सर्च ऑपरेशनवर बेस्ड आहे फिल्म... 
अर्जुन कपूरची ही फिल्म इंडियन ओसामा म्हणवल्या जाणाऱ्या इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी अब्दुल सुभान कुरैशी याच्या सर्च ऑपरेशनवर बनलेली आहे. यामध्ये 5 असे अनोळखी हीरोजची गोष्ट दाखवली आहे, जे अब्दुल सुभानला पकडण्यासाठी जातात. खास गोष्ट ही आहे की, सत्य घटनेवर आधारित या फिल्मचे सर्व हीरोज कोणत्याही हत्याराविना अब्दुलला पकडण्यासाठी गेले होते.

 

दहशतवाद खूप वेगाने वाढत आहे... 
यापूर्वी ट्रेलर रिलीज फिल्म आणि दहशतवादाविषयी बोलताना अर्जुन कपूर म्हणाल होता - 'दहशतवाद विश्वव्यापी झाला आहे. हा भारत आणि एशियाच्याही पुढे गेला आहे. हे काही असे आहे जे दुर्दैवाने खूप वेगाने वाढत आहे. आमची फिल्म त्या लोकांची अशी कहाणी आहे जे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी रोज सकाळी उठतात. 

बातम्या आणखी आहेत...