आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Center Plans Not Implemented As Intermediaries Do Not Receive Commission' PM Modi

'मध्यस्थांना कमिशन मिळत नसल्याने केंद्राच्या योजना लागू होत नाहीत' - पंतप्रधान मोदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता पोर्टच्या कार्यक्रमात मोदींनी १०२ व १०५ वर्षीय माजी कर्मचाऱ्यांचा गौरव केला. - Divya Marathi
कोलकाता पोर्टच्या कार्यक्रमात मोदींनी १०२ व १०५ वर्षीय माजी कर्मचाऱ्यांचा गौरव केला.
  • पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना नागरिकत्व मिळावे असे गांधीजींनाही वाटे
  • बेलूर मठाला भेट, कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150 व्या कार्यक्रमात सहभाग
  • डाव्यांच्या विरोधामुळे ममता बॅनर्जी कार्यक्रमात सहभागी होऊ शकल्या नाही
  • कोलकाता पोर्टचे नामकरण श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट केल्याची मोदींनी केली घोषणा

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी कोलकातामध्ये अनेक कार्यक्रमात सहभागी झाले. परंतु, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मात्र सहभागी झाल्या नाही. रविवारी बेलूरलाही मोदींनी भेट दिली. मोदी म्हणाले, नागरिकत्व कायदा कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेणारा नाही. उलट नागरिकत्व देणारा कायदा आहे. पाकिस्तानात अल्पसंख्यांकाची स्थिती काय आहे, हे जगाला ठाऊक आहे. महात्मा गांधीजी यांनाही भारताने पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना नागरिकत्व द्यावे, असे वाटे.

मोदींच्या हस्ते रविवारी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या १५० व्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ते म्हणाले, पोर्टला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी नाव देण्यात आल्याची घोषणाही मोदींनी या प्रसंगी केली. यावेळी पंतप्रधानांनी ममता सरकारला टोला लगावला. मी आज सुखाने झोप घेऊ शकतो. कारण गरीब कुटुंबांचा आशीर्वाद मला मिळतो. आयुष्यमान भारत योजनेद्वारे देशातील ७५ लाख गरिबांना मोफत उपचार मिळाला आहे. किसान योजनेतून ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांवर ४३ हजार कोटी रुपये थेट पाठवले आहेत. मात्र, पश्चिम बंगालमध्ये या योजना लागू केलेल्या नाहीत. कारण पैसे थेट शेतकरी व गरिबांच्या खात्यावर जमा होतात. त्यामुळे येथे सिंडिकेटला आता आपले कट मिळत नाही. मध्यस्थांना कमिशन मिळत नाही. कट नाही. मग योजनाही लागू नाही. राज्य सरकार या योजना लागू करणार आहे किंवा नाही, मला माहिती नाही. परंतु, धोरणकर्त्यांना ईश्वराने सद्बुद्धी द्यावी.

स्वामीजी म्हणत- सर्व विसरून देशाच्या सेवेत झोकून द्या : मोदी

मोदी म्हणाले, स्वामी विवेकानंद उतरत, त्या खोलीत एक अाध्यात्मिक चेतना आहे. मी देखील तेथे बराच वेळ होताे. स्वामीजी आपल्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करत आहेत, असा अनुभव येत होता. जणू ते नवी ऊर्जा भरत आहेत. सर्वकाही विसरून देशाच्या सेेवेत झोकून द्या, असे स्वामीजी सांगत.

कोलकातामध्ये तीव्र निदर्शने, मोदी गो-बॅकच्या घोषणा

ममता बॅनर्जी रविवारी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या नाहीत. त्यांना खरे तर भाषण द्यायचे होते. डाव्या पक्षांनी त्यांच्या भेटीला विरोध केला होता. त्यामुळे मोदींसोबत एकाच व्यासपीठावर जाण्याचे ममतांनी टाळले. रविवारी देखील डाव्या संघटनांनी मोदींना विरोध केला. गो-बॅकच्या घोषणाही दिल्या.

बातम्या आणखी आहेत...