आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

केंद्र आणि राज्य सरकारने पुर सदृष्य भागात 100 टक्के कर्जमाफी करावी- शरद पवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात महापूर आला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर मदतकार्य करत आहे. दरम्यान, या परिस्थितीवर बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक बाबी अधोरेखीत केल्या. पुरग्रस्त भागात मदतकार्य करण्यास शासकिय यंत्रणा कमी पडल्याचे ते म्हणाले.

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर-सांगलीत तर महापूर आला आहे. या महापुरामुळे हजारो नागरिकांना स्थलांतरीत होण्याची वेळ आलीये. नेव्ही, लष्कर आणि एनडीआरएफच्या टीम युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. दरम्यान, या परिस्थिवर बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवले. ते म्हणाले की, शासकिय यंत्रणा सपशेल फेल ठरली आहे. यावेळी त्यांनी अनेक बाबींवर आपले मत मांडले. 

ही परिस्थिती का उद्भवली आणि शासन तोकडे का पडले, याच्या खोलात जावे लागेल. कर्नाटक आणि महाराष्ट्रात जुना वाद आहे. परंतु कर्नाटक सरकारने वाद न करता मानवता म्हणून मदतीची भूमिका घ्यावी. राज्य सरकार जरी कमी पडत असले तरी केंद्राने राज्याच्या पाठीशी उभे राहावे. केंद्र सरकारच्या सर्व संघटना येथे पाठवण्याची गरज आहे. राजकीय टीकाटिप्पणी न करता लोकांना मदत कशी करता येईल, ही आमची भूमिका आहे, असेही पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.
 

राष्ट्रवादी पक्षाकडून वैद्यकीय मदत
राष्ट्रवादीचा डॉक्टर सेल अतिशय प्रभावी आहे. यात डॉक्टरांना संघटित करण्याचे काम केले आहे. याबाबत जशी गरज पडेल तसे हे डॉक्टर जाऊन वैद्यकीय सेवा देणार आहेत. वैद्यकीय सेवा आणि त्या अनुषंगाने औषधी देण्याची सेवा राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात येत आहे. अशाच प्रकारे इतरांनी पुढाकार घेऊन मदतकार्यात यावं, असंही पवार म्हणाले.

राष्ट्रवादीतर्फे 50 लाखांचा मदत निधी
पूरग्रस्त भागात मदतीचे आवाहन करताना पवार म्हणाले की,  आता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सार्वजनिक संस्था, सेवाभावी संस्था, तरुणांच्या संघटनांनी या सर्वांनी पुढाकार घेऊन मदतकार्याला हातभार लावण्यासाठी पुढाकार घ्यावा. पाणी ओसरताच विदारक परिस्थिती खऱ्या अर्थाने समोर येईल. राष्ट्रवादीचे जेवढेही लोकप्रतिनिधी आहेत त्या सर्वांनी आपले एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा जवळपास 50 लाखांचा निधी आम्ही देणार आहोत.
 

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
>पाणी पातळी वाढल्यामुळे उसाचे नुकसान
>पावसामुळे दाळिंब आणि द्राक्षाचे ही नुकसान
>लहान व्यावसायिकांचे नुकसान झाल्यामुळे त्यांच्याव आर्थिक संकट कोसळले
>दुधाची आवक 35 ते 40 टक्के कमी झाली
>पुरामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचे, शेतीचे, घरांचे आणि जनावरांचे मोठे नुकसान
>केंद्र आणि राज्य सरकारने पुर सदृष्य भागात 100 टक्के कर्जमाफी करावी
>राष्ट्रवादी पक्षाकडून वैद्यकीय मदत
>राष्ट्रवादीकडून 50 लाखांची मदत

0