Cabinet / आता विना हेलमेट गाडी चालवल्यास हजार रुपये, विमा नसल्यास 2 हजारांचा दंड; अल्पवयीन असल्यास पालकांना होणार शिक्षा

नवीन मोटर वाहन कायद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, एक लाखांपर्यंत दंडाची तरतूद

वृत्तसंस्था

Jun 25,2019 12:47:00 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने मोटर वाहन घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे. सुधारित विधेयकात आता वाहन आणि ट्रॅफिकचे नियम मोडणाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. रुग्णवाहिका आणि एमरजेंसी वाहनांना वाट न देणाऱ्यांना 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. क्षमतेपेक्षा जास्त स्पीडने वाहन चालवल्यास 1 हजार रुपये ते 2 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाचा प्रस्ताव आहे. वाहन परवाना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास टॅक्सी चालकांना 1 लाख रुपयांचा भुर्दंड बसेल. ओव्हरलोडिंग वाहनांवर सुद्धा यापुढे कठोर कारवाई केली जाईल. क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक केल्यास 20 हजार रुपयांचा दंडा आकारला जाईल.


नियम मोडणारा अल्पवयीन असल्यास पालकांना शिक्षा
> केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी या विधेयकाला मंजुरी दिली आहे. सोबतच, संसदेच्या चालू अधिवेशनातच ते दोन्ही सभागृहात मंजुरीसाठी मांडले जाणार आहे. वृत्तसंस्थेने सुत्रांच्या आधारावर ही माहिती दिली आहे.
> नवीन प्रस्तावात विमा नसलेले वाहन चालवताना आढळल्यास 2 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. तर हेलमेट नाही वापरल्यास 1 हजार रुपये भरावे लागणार आहेत. यासोबतच, 3 महिने वाहन परवाना निलंबित करण्याचा देखील प्रस्ताव आहे.
> विशेष म्हणजे, पालकांनीच आपल्या पाल्यांना वाहन नियमांचे पालन करण्यासाठी तयार करावे यावर भर देण्यात आला आहे. कारण, यापुढे मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणारी व्यक्ती अल्पवयीन असल्यास संबंधित दंड वाहनमालक आणि त्यांच्या पालकांना भरावा लागेल. यामध्ये गंभीर प्रकरणांत 3 वर्षांपर्यंतची कैद आणि 25 हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याचा प्रस्ताव आहे.
> ट्रॅफिक नियम मोडल्यास सध्या 100 रुपये दंड आकारला जातो. प्रस्तावात किमान दंड 500 रुपये करण्यात आला आहे. दंड भरण्यास नकार दिल्यास 500 च्या ठिकाणी 2000 रुपयांचा दंड लावला जाऊ शकतो.

X
COMMENT