आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वित्त अायाेगाचे घूमजाव : चार दिवसांपूर्वी आर्थिक स्थितीबाबत चिंता; अाता प्रशंसा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्याचे घटते महसुली उत्पन्न आणि ढासळत्या मानव विकास निर्देशांकाबद्दल चार दिवसांपूर्वीच चिंता व्यक्त करणाऱ्या केंद्रीय वित्त आयोगाने बुधवारी घूमजाव करत महाराष्ट्राची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत चांगली असल्याचे 'प्रशस्तिपत्र' दिले. आकडेवारीच्या आधारे राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत दिलेला अहवाल 'भ्रमात्मक'सुद्धा असू शकतो, असे सांगत त्यांनी अाधीच्या अहवालाबाबत सारवासारवही केली. नकारात्मक अहवालानंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर आयोगाने घूमजाव केल्याची चर्चा आहे. 


आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग यांनी सांगितले, राज्याचे महसुली उत्पन्न २००९ - २०१३ च्या तुलनेत २०१४-२०१७ या कालावधीत घसरले असले तरीही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती चांगलीच अाहे. वित्त आयोगाचे निष्कर्ष आकड्यांवर आधारित आहेत. ही आकडेवारी राज्य सरकारद्वारेच अायोगाला प्राप्त होते. आकड्यांवरून काढलेल्या निष्कर्षात राज्याने महसूलवाढीचा दर स्थिर ठेवला नाही, असे दिसते. मात्र, हे चित्र संभ्रम निर्माण करणारे असू शकते. त्यामुळे फक्त आकडेवारीवरून कोणत्याही ठोस निष्कर्षाप्रत येण्यापूर्वी दीर्घकालीन उपाययोजना व प्राप्त स्थितीचा विचार गरजेचा असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...