आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Central Government Is Violating Basic Rights By Keeping Leaders In Detention: Sharad Pawar

नेत्यांना नजरकैदेत ठेवून केंद्र सरकार मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत आहे, शरद पवारांसह अनेक नेत्यांनी केली सुटकेची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फारुक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना सोडण्याची विरोधकांची मागणी

दिल्ली- जम्मु काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने सुरक्षेची काळजी म्हणून नॅशनल कॉन्फ्रेंस पक्षांचे नेते फारूक अब्दूल्ला, उमर अब्दुल्ला तसेच पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानंतर 5 ऑगस्ट 2019 पासून हे नेते नजरकैदेत आहे. याचा विरोध करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या नेत्यांना सोडण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.


जम्मु काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने काश्मीरचे तिन्ही माजी मुख्यमंत्री, फारुख अब्दुल्ला, त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना ऑगस्ट 2019 पासून नजरकैदेत ठेवले आहे. त्यानंतर विरोधकांनी अनेकवेळा त्यांच्या सुटकेची मागणी केंद्र सरकारककडे केली. यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील नजरकैदेतील नेत्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करत त्यांना सोडण्याची मागणी केली आहे. पवारांसह ममता बॅनर्जी, एच डी देवेगौडा, डी राजा, यशवंत सिन्हा, अरूण शौरी, मनोज कुमार यांनीदेखील या नेत्यांना सोडण्याची मागणी केली आहे.