आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Central Leaders, At That Time Where Did Your 'religion' Go? The Feeling Of Congress MLAs In The State Intensified

केंद्रीय नेत्यांनो, तेव्हा कुठे गेला होता तुमचा ‘धर्म’? राज्यातील काँग्रेस आमदारांच्या भावना तीव्र  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला आता धर्मनिरपेक्ष विचारधारा आणि सगळी मूल्ये आठवत आहेत. पण, निवडणूक सुरू असताना हे केंद्रीय नेतृत्व कुठे गेले होते, अशा शब्दांत राज्यातील आमदारांनी अहमद पटेल यांना सुनावले आहे. 

काँग्रेसच्या एका आमदाराने “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले, आज आमच्या हायकमांडला आपले अधिकार समजत आहेत. पण, निवडणूक सुरू असताना कोणती कर्तव्ये यांनी पार पाडली? आणि, तसा जाब आम्ही केंद्रीय नेत्यांना विचारला आहे. पक्षाच्या एक महिला नेत्या म्हणाल्या, यांनी निवडणुकीत आम्हाला एकाकी सोडले. पक्षनिधी तर सोडाच, पण साधे नैतिक बळ आणि धीरही दिला नाही. निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवायची, हे विचारण्यासाठीही नेते आम्हाला उपलब्ध होत नव्हते. वाट फुटेल त्याप्रमाणे आम्ही चालत राहिलो. राज्यातील नेत्यांनी सोबत केली आणि मुख्य म्हणजे आमच्या बळावर आम्ही मतदारसंघात लढलो. शरद पवार असे उभे राहिले नसते, तर आमची स्थिती लाजिरवाणी असती. 

राज्य स्तरावरच्या एका नेत्याची प्रतिक्रिया महत्त्वाची होती. ते म्हणाले, भाजपचे सगळे केंद्रीय नेते महाराष्ट्रात झंझावाती सभा घेत असताना, आमचे हायकमांड काय करत होते? 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात नऊ सभा घेतल्या. जळगाव, साकोली, अकोला, परतूर, पनवेल, परळी, सातारा, पुणे, मुंबई या नऊ ठिकाणी मोदींच्या सभा झाल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यात १८ रॅली घेतल्या आणि रोड शोही केला. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या राज्यात पाच रॅली झाल्या. शिवाय एक मेळावा, एक रोड शो आणि एक पत्रकार परिषद. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात ३५ सभा घेतल्या. सभांसाठी आम्ही केलेले फोनही केंद्रीय नेते घेत नव्हते
 
सभांसाठी आम्ही केलेले फोनही केंद्रीय नेते घेत नव्हते, असे सांगून, पराभूत झालेले एक काँग्रेस उमेदवार म्हणाले, आमच्या मदतीला तेव्हा राज्यातील नेत्यांसोबत शरद पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे आले. पक्षाने आम्हाला चिन्ह वगळता बाकी काय दिले? “आमचा पक्ष मोठा आहे, पण निवडणुकीच्या काळात ज्यांना जबाबदारी समजत नाही, त्या नेत्यांनी आता अधिकाराची भाषा करू नये’, असे सांगत एक  काँग्रेस प्रवक्ते म्हणाले, “आता सत्तास्थापनेच्या मुद्द्यावर राज्यातील आमदार आक्रमक झाले आहेत. आणि, त्यांना कोणी रोखू शकत नाही.’