आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Central Trade Unions On 2 Day Nationwide Strike From Tuesday

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेंट्रल ट्रेड युनियनचे 20 कोटी कर्मचारी संपावर; कामगार कायद्यातील सुधारणा एकतर्फी असल्याचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कामगार कायद्यात केंद्र सरकारने केलेली दुरुस्ती एकतर्फी असल्याच्या आरोपासह देशभरातील 20 कोटी केंद्रीय कर्मचारी संपावर गेले आहेत. विविध केंद्रीय कामगार आणि औद्योगिक संघटनांनी मंगळवारपासून दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला. अखिल भारतीय ट्रेड युनियनच्या सरचिटणीस अमरजीत कौर यांनी सांगितल्याप्रमाणे, या संपात 10 कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. सरकारच्या लोकविरोधी आणि कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी संगठित आणि असंगठित असे दोन्ही प्रकारचे कर्मचारी सहभागी झाले असा दावा त्यांनी केला आहे.


देशव्यापी संपाचा दूरसंचार, आरोग्य, शिक्षण, कोळसा, पोलाद, वीज, बँकिंग आणि विमासह परिवहन सेवेला फटका बसला आहे. दोन दिवसांच्या या संपाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात बुधवारी नवी दिल्ली येथील मंडी हाऊसपासून संसद भवन पर्यंत एक मार्च सुद्धा काढला जाणार आहे. अशाच स्वरुपाचे आंदोलन देशात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. सरकारला यापूर्वी कामगारांच्या हितांसाठी काही महत्वाचे बदल करण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु, ते बदल करणे सोडून सरकारने कामगार कायद्यात एकतर्फी बदल करत देशभरातील कर्मचाऱ्यांवर अन्याय केला असे आरोप अखिल भारतीय ट्रेड युनियनने लावला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी ट्रेड युनियनने सप्टेंबर 2016 आणि नोव्हेंबर 2017 अशा दोन वेळा संप पुकारला होता. तरीही सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत असा आरोप लावला जात आहे.

 

पश्चिम बंगालमध्ये आंदोलनाला गालबोट
देशव्यापी संप सुरू असताना पश्चिम बंगालमध्ये डावे आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी दोन्ही परस्परविरोधी गटांत हिंसाचार देखील झाला. त्यामुळे, आंदोलनात पोलिसांना हस्तक्षेप करून शेकडो कार्यकर्त्यांना अटक करावी लागली. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये दोन्ही समूहाच्या कार्यकर्त्यांनी आणि कामगारांनी रेल्वे आणि रस्ते वाहतूक अडवली. त्यामुळे, राज्यातील दळण-वळण यंत्रणा खोळंबली आहे.