खुशखबर / सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी: महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ, 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीभेट, महागाई भत्त्यामध्ये 5 टक्के वाढ

वृत्तसंस्था

Oct 09,2019 02:59:31 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने दिवाळीपूर्वीच भेट दिली. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 5 टक्के वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी जाहीर केली. या वाढीव डीएसह केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 17 टक्के झाला असून त्याचा फायदा 50 लाख कर्मचाऱ्यांना आणि 62 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्राने महागाई भत्त्यामध्ये केलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ मानली जात आहे. या नवीन महागाई भत्त्यासह सहकारी तिजोरी आणि करदात्यांवर 16 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी यासोबतच पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत आधार कार्ड बंधनकारक करण्याची शेवटची तारीख वाढवली. आता शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक 30 नोव्हेंबरपर्यंत जोडता येईल. सोबतच, आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात 1000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यानुसार, त्यांना दरमहा 2000 रुपये दिले जाणार आहेत.

X
COMMENT