आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाॅटिंगहॅम- कर्णधार विराट काेहली अाणि चेतेश्वर पुजाराने अापल्या झंझावाती खेळीच्या बळावर यजमान इंग्लंडविरुद्धचा विजयाचा दावा मजबूत केला. टीम इंंडियाने तिसऱ्या कसाेटीच्या तिसऱ्या दिवशी दुसरा डाव ७ बाद ३५२ धावांवर घाेषित केला. यासह भारताने यजमान इंग्लंडसमाेर खडतर ५२१ धावांचे टार्गेट ठेवले. प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद २३ धावा काढल्या. कुक (९) अाणि जेनिंग्स (१३) मैदानावर कायम अाहेत. अाता ४९८ धावांनी पिछाडीवर असलेल्या इंग्लंडकडे अद्याप १० विकेट अाणि दाेन दिवस शिल्लक अाहेत. अाता इंग्लंडला झटपट दुसऱ्या डावात गुंडाळण्याचा भारतीय गाेलंदाजांचा प्रयत्न असेल. यासाठी या युवांनी कंबर कसली अाहे. भारताकडून दुसऱ्या डावात काेहलीने १०३ अाणि हार्दिकने नाबाद ५२ धावांची खेळी केली.
भारताने कालच्या २ बाद १२४ धावांवरून तिसऱ्या दिवशी साेमवारी खेळण्यास सुरुवात केली. पुजारा अाणि काेहलीने संयमी खेळी कायम ठेवताना भारताला सकाळच्या सत्रात चांगली सुरुवात करून दिली. यादरम्यान यजमान इंग्लंडच्या गाेलंदाजांचा टीम इंडियाच्या या जाेडीला राेखण्याचा प्रयत्न सपशेल अयशी ठरला. त्यामुळे भारतीय संघाला माेठी अाघाडी घेता अाली.
काेहली-पुजाराची शतकी भागीदारी
भारताच्या विजयाचा दावा मजबूत करण्यासाठी विराट काेहलीने कंबर कसली. यादरम्यान त्याला सहकारी चेतेश्वर पुजाराची माेलाची साथ मिळाली. या दाेघांनी तिसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यासह त्यांनी धावसंख्येचा अालेख उंचावला. यादरम्यान पुजाराने वैयक्तिक अर्धशतकही साजरे केले. त्याने २०८ चेंडूंचा सामना करताना ९ चाैकारांच्या अाधारे ७२ धावांची खेळी केली. त्याला गाेलंदाज स्टाेक्सने बाद केले. स्टाेक्सने सामन्यात दाेन गडी बाद केले. यासह त्याने ही जाेडी फाेडण्यात शानदार यश संपादन केले. मात्र, त्यानंतर हार्दिक अाणि काेहलीने माेठी अाघाडी मिळवून दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.