आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 हजारांपेक्षा जास्त कार विक्रीसाठी उपलब्ध, 15 हजारांपासून सुरुवात, 1 वर्षाची वॉरंटीही मिळतेय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅटो डेस्क - कार खरेदी करण्यासाठी लाखो रुपयांचे बजेट गरजेचे नाही. हवे असल्यास तुम्ही अत्यंत कमी किमतीतही कार खरेदी करू शकतात. मारुतीच्या कमी बजेटच्या कार तुम्ही True Value द्वारे खरेदी करू शकता. याठिकाणी कार फक्त 15 हजार रुपयांपासून सुरू होत आहेत. तर दोन लाख रुपयांच्या बजेटमध्ये स्विफ्ट सारख्या लक्झरी कार तुम्ही खरेदी करू शकता. या साइटवर सध्या 8 हजारांहून अधिक कार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 


936 शहरांमध्ये आऊटलेट 
ट्रू व्हॅल्यूचे देशभरातील 936 शहरांत 1190 आउटलेट आहेत. येथे सेलरची संपूर्ण माहिती चेक केली जाते. त्यामुळे कार खरेदी करणाऱ्याला भविष्यात अडचण येत नाही. येथून खरेदी केलेल्या गाड्यांना एका वर्षाची वॉरंटीही मिळते. तसेच 3 फ्री सर्व्हीस मिळतात. 


या कार उपलब्ध 
याठिकाणी सियाझ, मारुती 800, स्विफ्ट, ओमनी, अल्टो, वॅगन आर, रिट्ज अशा कार खरेदी करता येतात. त्यासाठी  www.marutisuzukitruevalue.com वर व्हिजिट करावे लागेल. त्याठिकाणी तुम्ही शहर आणि प्राइज रेंजनुसार सर्चिंग करू शकतात. कारचे टेस्ट ड्रायव्हींगही बूक करता येते. ब्रँड, ओनर, फ्यूल टाइप, कलर, किलोमीटर असे पर्याय सर्चिंगसाठी उपलब्ध आहेत. 

बातम्या आणखी आहेत...