आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअरिंग, फार्मसीसाठी एमएचटी-सीईटी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाराष्ट्र शासनातर्फे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे वेगवेगळ्या १६ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 


अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली एमएचटी-सीईटीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली असून त्यासाठी अंतिम मुदत २३ मार्चपर्यंत आहे. ही परीक्षा पहिल्यादांच ऑनलाइन पद्धतीने होत आहे. तसेच इतर विविध १६ अभ्यासक्रमांसाठीही येत्या मार्च, एप्रिल व मे २०१९ मध्ये या सर्व प्रवेश परीक्षा होणार असून www. mahacet.org या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच परीक्षेचे अर्ज प्रक्रिया व सविस्तर वेळापत्रकाविषयी अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. 


एमएचटी-सीईटीची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने असेल, अर्ज कसे भरावे, गुणांचा तपशील, सीईटीसाठी कोण पात्र असतील, परीक्षेची वेळ, याची सविस्तर माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी संकेतस्थळावरील माहिती वाचावी. त्यानंतर अर्ज भरावेत, असेही राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. 


इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी या बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अनिवार्य असलेली एमएचटी सीईटी परीक्षा यंदा ऑनलाईन पद्धतीने होत आहे. एमएचटी-सीईटीनंतर प्रवेश परीक्षा कक्षातर्फे वेगवेगळ्या १६ अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात एमबीए, एमसीए, एलएलबी, एएसी सीईटी, आर्किटेक्चर सीईटी, एचएमसीटी, बीपीएड, बी.एड व एम.एड. यांसह विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा होणार आहे. या सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून त्यातील केवळ दोन परीक्षांचा अपवाद वगळता सर्व परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या वेळापत्रक काही बदल झाल्यास ते कळविले जाणार असून विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर अधिक माहिती संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


अशी होईल सीईटी परीक्षा 
अर्ज करण्याची मुदत : १ जानेवारी ते २३ मार्च 
विलंब शुल्कासह अर्जाची मुदत : २४ ते ३१ मार्च 
शुल्क भरण्याची मुदत : ३ एप्रिल 
हॉल तिकीट उपलब्ध : २५ एप्रिल ते २ मे 
एमएचटी-सीईटी परीक्षा : २ ते १३ मे 
 

 

बातम्या आणखी आहेत...