आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकी, औषधनिर्माण, कृषी पदवीसाठी सीईटी ऑनलाइन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेण्यासाठी होणारी एमएचटी-सीईटी ही सामायिक प्रवेश परीक्षा यंदा जेईई मेनच्या धर्तीवर ऑनलाइन घेतली जाणार आहे. त्यावर सरकारने शिक्कामोर्तब केले असून, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने त्याबाबतचे परिपत्रक त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. सीईटीप्रमाणे अभ्यासक्रमाचे स्वरूप व रचना तयार केली. पहिल्यांदा आॅनलाइनद्वारे होणाऱ्या सीईटी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगची पद्धत राहणार नसल्याने परीक्षा देणाऱ्यांना लाभ हाेईल.

 

पहिल्यादांच एमएचटी सीईटीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत आहे. या परीक्षांसाठीचे अभ्यासक्रम व गुणांची विभागणी सीईटी सेलने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याच वेळी राज्य तंत्रशिक्षण विभागाकडून सीईटी परीक्षा ऑफलाइनऐवजी ऑनलाइन घेण्याचे नियोजन केल्याचे प्रस्तावात म्हटले होते. 


या प्रस्तावावर राज्यातील विद्यार्थी, तज्ज्ञ व नागरिकांचे अभिप्राय मागविण्यात आलेले होते. त्यासाठी १५ नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिल होती. त्यानंतर सीईटी सेलने परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. 


सीईटी ऑनलाइन घेण्याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षकतज्ज्ञ यांच्याकडून प्रतिक्रिया मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी सीईटी सेलने http://www.mahacet.org या वेबसाइटवर माहितीसह दहा प्रश्नांची प्रश्नावली प्रसिद्ध केली आहे. ही प्रश्नावली विद्यार्थी, पालक, शिक्षकतज्ज्ञ यांना १५ नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहे, असे सीईटी सेलने सांगितले आहे. 


सराव परीक्षा घेण्याची आवश्यकता 
जेईई मेनची परीक्षा जेव्हा ऑनलाइन पद्धतीने घेतली होती. त्यानुसार नमुना व सराव प्रश्नपत्रिका त्यांच्या वेबसाइटवर टाकल्या होत्या. यंदापासून सीईटी सेल विभागाने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. मात्र संगणकावर पेपर सोडविण्यासाठी कशा पध्दतीने हाताळणी करावी, याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. ऐनवेळी विद्यार्थी गोंधळात पडतात. शिक्षण विभागाने सराव परीक्षा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. 


परीक्षा मेच्या तिसऱ्या आठवड्यात 
अकरावी व बारावी अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा असते. अकरावीचा २० टक्के तर बारावीच्या ८० टक्के अभ्यासक्रमास महत्त्व असेल. या परीक्षेसाठी ९० मिनिटांचा कालावधी असून १०० गुणांचा प्रत्येक पेपर असेल. परीक्षेत विविध पर्याय प्रश्न असतील. फिजिक्स, केमिस्ट्री, गणित, बायोलॉजी या विषयाच्या अकरावीमधील १० प्रश्न तर बारावीमधील ४० प्रश्न असतील. अधिक माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर दिली आहे. परीक्षा मे च्या तिसऱ्या आठवड्यात असेल. 
Ãसीईटी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने सकारात्मक फायदा होईल. थिअरीवर जोर देत होते. परंतु आता प्रॅक्टिकल बेसिकवर प्रश्न येण्याची शक्यता आहे. ऑनलाइन झाल्याने कागदाचा खर्च कमी होईल. तसेच मनुष्यबळ कमी लागेल. गैरप्रकार होणार नाहीत. पहिल्या वर्षी काही अडचणी आल्यास त्याची पुढील वर्षी सोडवणूक होईल. - प्रा. शशिकांत कलबुर्गी 

 

बातम्या आणखी आहेत...