• Home
  • Bollywood
  • Gossip
  • Chaahat Khanna revealed about casting couch, saying 'It had become a fashion trend, some took benefit some not.'

बॉलिवूड / चाहत खन्नाने कास्टिंग काउचबद्दल केला खुलासा, म्हणाली - 'हा एक फॅशन ट्रेंड बनला होता, कुणी फायदा घेतला कुणी नाही'

संजय दत्तच्या 'प्रस्थानम' मध्ये दिसणार आहे अभिनेत्री चाहत खन्ना

Sep 15,2019 05:50:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री चाहत खन्ना, अभिनेता संजय दत्तचा गामी चित्रपट 'प्रस्थानम' मध्ये दिसणार आहे. याचदरम्यान चाहत खन्नाने कास्टिंग काउच आणि मीटू अभियानाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. चाहत खन्ना अशातच स्पॉटबॉयला दिलेल्या एका मुलाखतीत 'प्रस्थानम' चित्रपटांबरोबरच फिल्म इंडस्ट्रीतील वातावरणाबद्दलही बोलली. मुलाखतीत तिला कास्टिंग काउचबद्दलही प्रश्न केले गेले. यावर ती म्हणाली, 'चित्रपटांत कास्टिंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, जर मी तुमच्यासाठी हे करत आहे तर त्या बदल्यात तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी वेगळे करावे लागेल. ही अभिनेत्री आणि निर्माता यांच्यातील बाब असते. मात्र आता कास्टिंग काउच काही प्रमाणात कमी झाले आहे.'


मीटू अभियानाबद्दल चाहत खन्ना म्हणाली, 'हा एक फॅशन ट्रेंड बनला होता, कुणी फायदा घेतला कुणी नाही. काही अशाही होत्या ज्यांनी चेक घेऊन आपले तोंड बंद ठेवले आणि ज्यांचा पब्लिसिटी स्टंट होता तो यशस्वी झाला. मी अशा अनेक अभिनेत्रींना ओळखते, ज्यांना त्यादरम्यान गप्प बसने योग्य वाटले. पण मी तुम्हाला सांगू इच्छेत की, अनेक असेही कलाकार होते, ज्यांची नावे समोर यायला हवी होती, पण ती आली नाही.'


'प्रस्थानम' चित्रपटात संजय दत्तसोबत मनीषा कोयराला, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, अली फजल, अमायरा दस्तूर आणि सत्यजीत दुबे यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 20 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

X