Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Chain fasting for pending wages of Hindustan Aeronautics Limited Workers Union

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कामगार संघटनेचे प्रलंबित वेतनकरारसाठी साखळी उपोषण, जागृती विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांकडून सामुहिक मुंडन

प्रतिनिधी, | Update - Jun 25, 2019, 02:21 PM IST

आंदोलन तीव्र करण्यासाठी येत्या काळात बंगळुरु मुख्यालयासमोर करणार आंदोलन

 • Chain fasting for pending wages of Hindustan Aeronautics Limited Workers Union

  ओझर - भारतीय वायुसेनेचा कणा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील विमाननिर्मिती कारखाना हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एच.ए.एल) आणि अखिल भारतीय एच.ए.एल ट्रेड यूनियन को-ऑर्डिनेशन कमिटी च्या अंतर्गत नाशिक कामगार संघटनेच्या वतीने रखडलेल्या वेतन करारासाठी दिनांक २५ जून ते ०२ जुलै या दरम्यान संघटनेच्या मुख्य प्रवेशद्वारावर साखळी उपोषण सुरु करण्यात आले.संघटनेच्या पदाधिकार्यांच्या वतीने कारखान्याच्या मुख्य प्रवेश द्वारावर " हमारी मांगे पुरी करो" अश्या जोरदार७ घोषणाबाजी करण्यात आली.  ३० महिन्यापासून प्रलंबित वेतनकराराची चर्चा व्यवस्थापनाच्या आडमुठेपणा मुळे रखडली आहे. ०१ जानेवारी २०१७ च्या वाढीव वेतन कराराचे लाभ अधिकारी वर्गाला मिळत असून आस्थापनाचे आधारस्तंभ असलेल्या कामगारांची मात्र व्यवस्थापन क्रूर चेष्टा करत आहे.निष्पक्ष आणि रास्त आणि विनाविलंब वेतन करार ही सर्व भारतातील एच.ए.एल संघटनांची रास्त मागणी आहे.


  कामगार वर्ग हा कुठल्याही आस्थापनेचा मूळ पाया असतो त्याचिच् गळचेपी करण्याचा प्रकार एच.ए.एल व्यवस्थापन करत आहे.देशभरातील सगळ्या पि.एस.यु चे वेतनकरार चांगले असे झाले आहेत आणि एच.ए.एल च्या समकक्ष पी.एस.यु चे देखील वेतनमान वाढले आहेत. केवळ एच.ए.एल कामगारांचे वेतनमान न वाढल्याने कामगार वर्गात असंतोष पसरत आहे. त्याचा उद्रेक होण्यापर्यन्त परिस्थिति चिघळवू पाहत आहे. आस्थापनेची आर्थिक स्तिथि चांगली असून अधिकारी वर्गास भरघोस वाढ देणारे व्यवस्थापन कामगार वर्गाला अतिशय तूटपूंजी वाढ देवून सापत्न वागणूक देत आहे. असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

  देशभरातील एच.ए.एल च्या सर्व प्रभागांमध्ये याचा निषेध म्हणून साखळी उपोषण आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आंदोलनाचा भाग म्हणून सर्व एच.ए.एल च्या सर्व प्रभागांमध्ये कामगार बांधवांना २४ जून रोजी 'वेतन करार माहितीपत्रक' वाटप करण्यात आले आहे.आंदोलन तीव्र करण्यासाठी बंगलौर मुख्यालयासमोर देखील आंदोलन करण्यात येणार आहे. व्यवस्थापन वेळकाढु आणि आडमुठे धोरण अवलंबित असल्याने त्याचा निषेध करत देशभरातील एच.ए.एल च्या सर्व संघटना आपल्या न्याय्य हकक मागण्यांसाठी साखळी उपोषण करत असल्याचे प्रतिपादन ऑल इंडिया एच.ए.एल समन्वय समितीचे प्रवक्ते बी.व्ही.शेळके आणि एच.ए.एल कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यांनी केले. यावेळी कार्याध्यक्ष अशोक गावंडे उपाध्यक्ष जीतू जाधव, कमलेश धिंगाने,अनंत बोरसे,पवन आहेर,योगेश ठुबे, सहचिटनीस दीपक कदम,गिरीश वलवे,मिलिंद निकम, योगेश देशमुख,संतोष पोकळे,ख़जिनदार अमोल जोशी,संघटक सचिव मनोज (बापू) भामरे सदस्य सुरेश पाटिल,रमेश कदम,भूषण व्यास,स्वप्निल तिजोरे, मनोहर खालकर ,सागर कदम, दत्तू चव्हाण,चेतन घुले ,मन्सूर शैख़,संतोष आहेर, नितिन पाटिल, कैलास सतभाई, योगेश अहिरे,संदीप कुटे,मंगेश थेटे,नितिन पगारे,राजशेखर जाधव,राजेंद्र मोरे,गणेश गवारे,नंदू चव्हाण, महेंद्र जाधव आदि सहभागी आहेत.

  जागृती विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांकडून सामुहिक मुंडन

  गेल्या १ जून २०१७ चा कामगारांचा वेतन करार गेल्या ३० महिन्यापासून रखडलेला आहे. आणि अतिशय तुटपुंजी ऑफर व्यवस्थापनाकडून दिली जात असल्यामुळे आक्रमक पणे सामूहिक मुंडन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जागृती ग्रुपने सत्ताधाऱ्यांना कामगारांच्या भावना लक्षात घेत सरचिटणीस सचिन ढोमसे आणि अध्यक्ष भानुदास शेळके यांना निवेदन देऊन त्यात आंदोलनाचे विविध पर्याय सुचविले होते. त्याच प्रमाणे आंदोलन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. भरघोस असा वेतनवाढीचा करार करण्याकरिता आंदोलनाचा एक भाग म्हणुन जागृती विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वारा वर सामुहिक मुंडन करून उपोषणाला सुरुवात केली.व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी एक प्रकारे आंदोलनाला आक्रमक दिशा देण्याचा प्रयत्न आणि आवाहन करण्यात आले आहे.

 • Chain fasting for pending wages of Hindustan Aeronautics Limited Workers Union
 • Chain fasting for pending wages of Hindustan Aeronautics Limited Workers Union
 • Chain fasting for pending wages of Hindustan Aeronautics Limited Workers Union

Trending