आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन तासांत ७० हजारांच्या दोन सोनसाखळ्यांची चोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कुरिअर बॉय असल्याचे सांगत सोनसाखळी लांबवण्याचा प्रकार ताजा असताना पादचारी महिलांना लक्ष्य करत दोन महिलांच्या गळ्यातील ७० हजारांचे मंगळसूत्र खेचण्यात आले. अवघ्या दोन तासात शिवाजीनगर आणि नारायण बापूनगर येथे या दोन घटना घडल्या. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेली माहिती आणि ज्योती मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुपारी १२ वाजता घरातून पायी गॅस एजन्सी कार्यालयाकडे जात असतांना काळ्या दुचाकीवरील दोघांनी गळ्यातील २० हजारांचे मंगळसूत्र खेचून पलायन केले. या घटनेची तक्रार देण्यास महिला पोलिस ठाण्यात गेली असता दुपारी २ वाजता नारायण बापूनगर येथे पायी जाणाऱ्या रत्ना पवार यांच्या गळ्यातील ५० हजारांचे मंगळसूत्र खेचण्यात आले. पाठोपाठ घडलेल्या प्रकारांनी महिलांमध्ये भीती पसरली अाहे. दोन दिवसांत तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्याने पोलिसांच्या गस्तीवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...