आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेनसाखळी चाेराला पत्नीने राेज तीन चेन चाेरण्याचे दिले टार्गेट; कमी कष्टात जास्त पैशाचा माेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- कर्नाटक पाेलिसांनी २९ वर्षीय महादेवी या अाराेपीला अटक केली. तिचा पती अच्युत कुमारलाही यापूर्वीच अटक झाली हाेती. चाैकशीत त्याने सांगितले हाेते की ‘पत्नी मला चाेरी करण्यास भाग पाडत हाेती. तिच्यामुळेच मी चाेरी करत हाेताे.’ 


साेनसाखळी चाेर म्हणून कुख्यात असलेल्या अच्युतकुमारने अातापर्यंत १०० हून अधिक मंगळसूत्रे चाेरली. पत्नी महादेवीने त्याला राेज तीन साेनसाखळी चाेरीचे टार्गेटच ठरवून दिले हाेते. कमी कष्टात जास्त पैसे कमावण्याचा तिला माेह हाेता. पतीला अटक झाल्याचे कळताच ती मंडी जिल्ह्यातील नागमंगल अनाथालयातून फरार झाली हाेती.


महादेवीला महागड्या वस्तू खरेदीची हाैस हाेती. ती बहुतांश वेळा गाेव्यात माैजमजेसाठी जात असे. तिने चाेरी केलेल्या साेन्याच्या चेनचे वजन करण्यासाठी चक्क एक मशीनच खरेदी केले हाेते. या दांपत्याचे ५ वर्षांपूर्वी लग्न झाले हाेते. अच्युत कुमारने मागील सात महिन्यांत सुमारे एक काेटी रुपयांचे दागिने चाेरले. इतर अनेक गुन्ह्यांतही ताे सामील हाेता.

बातम्या आणखी आहेत...