Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Chaitanya in the market due to the festival of light

दीपोत्सवामुळे बाजारपेठांमध्ये चैतन्य: मोबाइल खरेदीला प्राधान्य, फुलांची मोठी आवक

प्रतिनिधी | Update - Nov 07, 2018, 10:42 AM IST

लक्ष्मीपूजनासाठी नवे कपडे, पूजा साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू

 • Chaitanya in the market due to the festival of light

  नगर - दिव्यांचा सण असलेल्या दिवाळीला धनत्रयोदशीपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. बुधवारी लक्ष्मीपूजन असल्याने बाजारपेठेत गर्दी उसळली आहे. ग्राहकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. जिल्ह्यात दुष्काळी वातावरण असतानाही बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे.
  कापडबाजार, माळीवाडा, चितळे रस्ता, चौपाटी कारंजा, सर्जेपुरा, स्टेशन रोड, केडगाव, नवनागापूर, प्रोफेसर कॉलनी या भागात ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.

  यंदा मोबाइल व इलेक्ट्रॉनिक वस्तूंना चांगली मागणी आहे. लक्ष्मीपूजनासाठी नवे कपडे, पूजा साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू होती. संध्याकाळी कापडबाजारात चालण्यासाठीही जागा राहिली नव्हती. शहरातील बहुतेक रस्त्यांवरच पूजासाहित्याची दुकाने थाटण्यात आल्याने बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली.मंगळवारी फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने भाव कोसळले. झेंडू ४० ते ५० रुपये किलो, शेवंती १०० रुपये किलो, अॅस्टर ७० रुपये असा भाव होता. गेल्या वर्षी कमी आवक झाल्यामुळे फुलांचे भाव कडाडले होते.


  सोन्या-चांदीचे दागिने खरेदीसाठी सराफ बाजारात मोठी गर्दी झाली आहे. भेटवस्तू घेण्यासाठी विविध दालनांमध्ये गर्दी दिसत आहे. सावेडी व केडगाव येथील मैदानावर फटाक्यांचे स्टाॅल थाटण्यात आले असून, फटाके खरेदीसाठी गर्दी आहे. आकाशकंदिलांसह अन्य वस्तूंच्या खरेदीला मोठा प्रतिसाद आहे. यंदा शाळांमधून फटाकेमुक्त दिवाळीची शपथ देण्यात आली असली, तरी फटाक्यांच्या आवाजांनी शहर दणाणून गेले आहे.

 • Chaitanya in the market due to the festival of light
 • Chaitanya in the market due to the festival of light

Trending