Home | Jeevan Mantra | Dharm | Chaitra Navratri 2019 kanya pujan vidhi

कुमारिकांना मानले जाते देवीचे स्वरूप, यामुळे नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीला केले जाते कन्या पूजन..

रिलिजन डेस्क | Update - Apr 13, 2019, 12:02 AM IST

नवरात्रीमध्ये 2 ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलींची करावी पूजा, हे आहे महत्त्व

 • Chaitra Navratri 2019 kanya pujan vidhi

  सध्या चैत्र नवरात्री सुरु आहे. नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथिला कन्या पूजन करण्याची प्रथा आहे. यावेळी अष्टमी आणि नवमी तिथी 13 एप्रिलला शनिवारी आहे. धर्म ग्रंथानुसार मुली साक्षात देवीचे स्वरूप असतात यामुळे नवरात्रीमध्ये यांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. कन्या पूजन विधी आणि महत्त्व खालीलप्रमाणे आहे.


  कुमारिका पूजनाचा विधी
  कुमारिका पूजांमध्ये 2 ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलींचीच पूजा करावी त्यापेक्षा कमी किंवा जास्त वयाच्या मुलींची पूजा वर्ज्य सांगण्यात आली आहे. सामर्थ्यानुसार नऊ दिवस किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मुलीना जेवणाचे आमंत्रण द्यावे. मुलीना आसनावर बसवून ऊँ कौमार्यै नम: मंत्राचा उच्चार करीत त्यांची पूजा करावी.


  त्यानतंर मुलीना जेवायला वाढावे. जेवणामध्ये गोड पदार्थ अवश्य असावेत. जेवण झाल्यानंतर मुलींची पाद्यपूजा करावी तसेच भेटवस्तू द्यावी. त्यानंतर हातामध्ये फुलं घेऊन खालील श्लोकाचा उच्चार करावा...


  मंत्राक्षरमयीं लक्ष्मीं मातृणां रूपधारिणीम्।
  नवदुर्गात्मिकां साक्षात् कन्यामावाहयाम्यहम्।।
  जगत्पूज्ये जगद्वन्द्ये सर्वशक्तिस्वरुपिणि।
  पूजां गृहाण कौमारि जगन्मातर्नमोस्तु ते।।


  त्यानंतर हातामधील फुलं कुमारिकांच्या चरणावर अर्पण करून त्यांना सन्मानाने वाटी लावावे.


  किती वर्षाच्या मुलीची पूजा केल्याने कोणते फळ प्राप्त होते...
  1. श्रीमद्देवीभागवत महापुराणातील तृतीय स्कंधानुसार 2 वर्षाच्या मुलीला कुमारी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने गरिबी दूर होते.
  2. तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने धर्म, अर्थ आणि काम प्राप्ती होते. वंश पुढे वाढतो.
  3. चार वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळते.
  4. पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व रोंगाचा नाश होतो.
  5. सहा वर्षाच्या मुलीला कालिका म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने शत्रूंचा नाश होतो.
  6. सात वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणतात. या मुलीच्या पूजेने धन, ऐश्वर्य प्राप्त होते.
  7. आठ वर्षाच्या मुलीला शांंभवी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने दुःख दूर होतात.
  8. नऊ वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने परलोकात सुख मिळते.
  9. दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.

Trending