आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोदवीर भाऊ कदमने पूर्ण केली वयाची पन्नाशी, बघा कुटुंबीयांनी दिलेल्या सरप्राइजची खास झलक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला विनोदवीर भाऊचंद्रम कदम अर्थातच प्रेक्षकांचा लाडका भाऊ कदमचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहे. वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला भाऊच्या कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसाठी त्याच्यासाठी सरप्राइज बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. ढोलताशांच्या गजरात त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

भाऊ कदमच्या या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करुन 50 व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा भाऊ कदम... असाच महाराष्ट्राला आनंद देत राहा मित्रा.... अशा शब्दांत रवी जाधव यांनी भाऊला शुभेच्छा दिल्या आहेत. 

भाऊ कदम आणि त्यांची पत्नी ममता यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. मृण्मयी, संचिती आणि समृद्धी ही त्यांच्या मुलींची तर आराध्य हे मुलाचे नाव आहे. 

बातम्या आणखी आहेत...