आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...म्हणून त्या मुलीने या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या हॉटेलचे बिल दिले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींनी देखील विनोदी भूमिका लीलया साकारल्या आहेत. विनोद करणं हे अभिनेत्रीचे काम नाही किंवा त्यांना ते तितकं जमणार नाही असा समज चुकीचा ठरवत झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ मधील पुरुष मंडळींच्या टीममध्ये असलेली एकमेव अभिनेत्री श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रच नव्हे तर जगभरातील लोकांची मनं जिंकली आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून कामगिरी करताना तिने प्रचंड मेहनत घेतली. महाराष्ट्र दौरा, देश दौरा आणि विश्व दौरा अशा ‘चला हवा येऊ द्या’च्या यशस्वी प्रवासानंतर श्रेयाला प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली.