आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 'Chalang' Release Date Changed, Now Rajkumar Nusrat's Movie Will Be Release In The Summer Holidays

'छलांग'ची रिलीज डेट बदलली, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये येईल राजकुमार-नुसरतचा चित्रपट

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : हंसल मेहता दिग्दर्शित राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांचा चित्रपट 'छलांग' आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये रिलीज होणार आहे. मेकर्सने याची डेट पुढे ढकलून 12 जून 2020 केली आहे. निर्मात्यांनी हा निर्णय परीक्षांमुळे घेतला आहे. चित्रपटाची कथा शाळेच्या पीटी टीचरची आहे, त्यामुळे टार्गेट ऑडियंसदेखील शाळेची मुले आहेत.  

निर्माता लव्ह रंजनने सांगितले की, "आम्हाला वाटते की, 'छलांग', लव्ह फिल्म्सचा सर्वात प्रेरणादायी आणि सुंदर चित्रपटांपैकी एक आहे आणि या प्रकारच्या विशेष चित्रपटाला एक उत्तम रिलीजचा हक्क आहे." हंसल मेहता दिग्दर्शित "छलांग" अजय देवगण, लव्ह रंजन आणि अंकुर गर्गने प्रोड्यूस केला आहे.