आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Challenge For India To Save Series Against Bangladesh For The Second Time In Four Years

बांगलादेशविरुद्ध भारताला चार वर्षांत दुसऱ्यांदा मालिका वाचवण्याचे आव्हान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी खेळपट्टीची पाहणी करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा. - Divya Marathi
बुधवारी खेळपट्टीची पाहणी करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा.

राजकोट : भारत व बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज राजकोट येथे सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर खेळवला जाईल. सामन्यास सायंकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल. पहिल्या टी-२० मध्ये भारताला पराभूत करत बांगलादेश सध्या मालिकेत १-० ने पुढे आहे. मालिकेत कायम राहण्यासाठी टीम इंडियाला विजय मिळवणे आवश्यक आहे. भारतीय संघावर चार वर्षांत दुसऱ्या मालिका गमावण्याची नामुश्की ओढवू शकते. २०१५ मध्ये बांगलादेशने आपल्या घरच्या मैदानावर वनडे मालिकेत भारताला २-१ ने हरवले होते. त्या वेळी महेंद्रसिंग धोनी संघाचा कर्णधार होता. आता शकिब अल हसन आणि तमीम इक्बाल यांच्या अनुपस्थितीत भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशने पहिला सामना जिंकून सर्वांना धक्का दिला.
बांगलादेशच्या पहिल्या सामन्यातील अंतिम ११ मध्ये बदल होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे, टीम इंडियात खलील अहमदच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी दिली जाऊ शकते. खलील पहिल्या सामन्यात खास काही करू शकला नाही. लाकेश राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे.

खेळपट्टीवर उच्च धावसंख्या; सरासरी १८९ धावा

हवामान : गुजरात किनारपट्टीच्या भागात सध्या चक्रीवादळाचा प्रभाव आहे. राजकोटपर्यंत त्याचे परिणाम दिसत आहेत. त्यामुळे पावसाची शक्यता आहे. ही शक्यता दिवसा अधिक असून रात्री कमी आहे. राजकोटममध्ये त्वरीत मैदान सुकवण्याची चांगली सुविधा आहे.

खेळपट्टी अहवाल : राजकोटची खेळपट्टी उच्च धावसंख्येची आहे. येथे झालेल्या २ टी-२० लढतीत सरासरी १८९ धावांची आहे. सुरुवातीला स्विंग करण्याची क्षमता असलेल्या वेगवान गोलंदाजांना काही मदत मिळू शकते. गुरुवारी ढगाळ वातावरण असू शकते

पंतची भारतातील सरासरी केवळ १५ ची
आक्रमक फलंदाज ऋषभ पंत २१ टी-२० सामन्यात केवळ २० व्या सरासरीने धावा करू शकला. भारतात झालेल्या ९ टी-२० मध्ये त्याची सरासरी कमी होत १५ वर आली आहे. पहिल्या लढतीत पंत यष्टिरक्षणात व डीआरएस घेण्याच्या चुकल्याने टीकेचा धनी ठरला.

१०० टी-२० खेळणारा खेळाडू बनेल राेहित
राजकोट मैदानावर भारताने २ टी-२० सामने खेळले. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. २०१७ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताचा पराभव झाला.


हा रोहित शर्माच्या करिअरमधील १०० वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना असेल. पाकिस्तानचा शोएब मलिक (१११) पुढे आहे.
रोहितच्या नावे टी-२० मध्ये सर्वाधिक (२४५२) धावा करण्याचा विक्रमदेखील आहे.