आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर जाधवांपुढे कुणबी समाजाचे नेते सहदेव बेटकर यांचे आव्हान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड : कोकणातील गुहागर मतदारसंघात शिवसेनेचे भास्कर जाधवांपुढे आदिवासी समाजाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सहदेव बेटकर यांनी आव्हान उभे केले आहे. सुरवातीला जाधव ही निवडणूक एकहाती जिंकतील असे चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र आता या ठिकाणी भाजपचे विनय नातू हे युतीधर्म पाळून जाधवांच्या प्रचाराला लागले असले तरी संघ विचाराचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्याचा फटका जाधव यांना बसेल.

१९७८ पासून गुहागर विधानसभा मतदारसंघावर सुरुवातीला जनता दल आणि त्यानंतर भाजपची अधिसत्ता राहिली आहे. १९८० चा अपवाद सोडल्यास २००९ पर्यंत येथे भाजप म्हणजेच नातू कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. २००९ मध्ये भाजपने हा मतदारसंघ रामदास कदम यांच्यासाठी सेनेला सोडला व भाजपला इथं घरघर लागली. डॉ. विनय नातू यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष लढवली. रामदास कदम व डॉ. विनय नातू या दोघांत मते विभागल्याने राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांना लॉटरी लागली. या निवडणुकीनंतर डॉ. विनय नातू पुन्हा भाजपमध्ये परतले. २०१४ मध्ये ते भाजपकडून लढले. शिवसेना-भाजपने स्वबळावर लढवलेल्या या निवडणुकीत नातूंना पुन्हा अपयश आले. त्यामुळे गेली १० वर्षे जाधव यांचेच वर्चस्व आहे. आता जाधव शिवसेनेच्या तिकिटावर लढत असून नातू प्रचारात सक्रिय झाले आहेत.

काँग्रेसनेही केला प्रतिष्ठेचा मतदारसंघ
शारदेच्या दरबारात भास्कर जाधवांचे जाखडी नृत्

तुरंबव गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री शारदेच्या दरबारात नवरात्र उत्सवामध्ये होणाऱ्या पारंपरिक जाखडी नृत्यामध्ये भास्कर जाधव दरवर्षी रममाण होतात. कमरेला धोतर, त्यावर शेला आणि डोक्यावर पगडी अशा वेशभूषेत सारे ग्रामस्थ नाचतात, त्यांच्यासोबत जाधवही ताल धरतात. निवडणुकीची धामधूम सुरु असतानाही जाधव यांनी याहीवर्षी फेर धरला.

शिवसेना ते राष्ट्रवादी : सहदेव बेटकर यांचा राजकीय प्रवास
सहदेव बेटकर हे मुंबईतील उद्योजक असून शिवसेनतून ते राजकारणात सक्रिय होते. २०१७ मध्ये संगमेश्वर-कडवई जिल्हा परिषदेवर ते विजयी झाले. त्यांना शिक्षण व अर्थ सभापतिपद मिळाले. याबरोबरच त्यांनी गुहागरमधून आमदारकीसाठी तयारीही सुरू केली. सेनेने नाकारल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले. या मतदारसंघात कुणबी समाज ६०-६५ टक्के आहे. सहदेव बेटकर हे आपल्या समाजाच्या याच मताच्या संख्येवर लक्ष ठेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

जाधवांना कुणबी समाजाची मदत मिळणे कठीण
भास्कर जाधव हे मराठा समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. तर त्यांच्यासमोर असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार सहदेव बेटकर हे कुणबी समाजाचे नेतृत्व करतात. यामुळे या आधी शिवसेनेला मिळणारी कुणबी समाजाची मदत यावेळी मात्र मिळणे कठीण आहे. त्यामुळे येथे जरी जाधवांचे पारडे जड असले तरी त्यांच्यासाठी ही निवडणूक पूर्वी इतकी सोपी राहिलेली नाही.