आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबहराइच - जिल्ह्यातील एका गावात 3 दिवसांपूर्वी आलेल्या एका बाबाचा कारनामा पाहून ग्रामस्थ आश्चर्यचकीत झाले आहेत. कारण हा बाबा गावातील एका 60 फूट उंच झाडावर रात्री आराम करतो आणि सकाळी खाली उतरतो. बाबाचा हा कारनामा पाहण्यासाठी दूरून लोक येत आहेत. तर हा चमत्कार असल्याचे काहींचे म्हणणे आहे. सध्या या बाबाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
> महसी तालुक्यातील खसहा गावातील ही घटना आहे. येथील मजरा बदलूपुरवा भागातील एका हनुमान मंदिराजवळील एका अशोकाच्या झाडावर रात्रीच्या वेळी एक व्यक्ती आराम करत असल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.
> मिडीया रिपोर्टनुसार, गावातील संतोष शुक्ल यांनी सांगितले की, तीन दिवसांपूर्वा गावात एक बाबा आले. त्यांनी सांगितले की, बऱ्याच दिवसांपासून गावात भंडारा केलेला नाही...... तर तो करा.
> पण त्यांनी स्वत: बद्दल जास्त काही सांगितले नाही. दररोज संध्याकाळी 7 वाजता अशोकाच्या झाडावर चढतात. त्यांनी तेथे सर्वांत उंचीवर झाडाच्या पानांचे आसन तयार केले आहे.
सकाळी खाली उतरतो बाबा
> ग्रामस्थांच्या मते, बाबा सकाळी 8.30 वाजता झाडावरून खाली उतरतात. आश्चर्याची बाब म्हणजे दैवी अवतार समजून लोक येथे पूजा-पाठ करत आहेत.
> स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांना देखील या चमत्कारी बाबाची माहिती मिळाली आहे. लोक या व्यक्तीला अशोक बाबा नावाने ओळखत आहेत.
> हा बाबा कोण आहे? कोठून आला आहे. याबाबत अद्यापही कोणतीही माहिती मिळाली नाहीये.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.