Sport news / अॅथलेटिक्स : धावपटू बराेबरीत; फिनिश लाइनपूर्वी टकरने डाइव्ह मारून चॅम्पियन

४९.३८ सेकंदांत रेस पूर्ण करून जिंकले सुवर्णपदक

दिव्य मराठी

May 14,2019 10:45:00 AM IST

न्यूयॉर्क - अमेरिकेच्या २० वर्षीय धावपटू इनफाइनाइट टकरने रेस जिंकण्याचा एक वेगळाच पराक्रम गाजवला आहे. टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीच्या या धावपटूने साऊथ ईस्टर्न कान्फरन्स नॅशनल चॅम्पियनशिपच्या दरम्यान डाइव्ह मारून फिनिश लाइन गाठली आणि सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. नियमानुसार या धावपटूच्या शरीराच्या पुढील भागाने फिनिश लाइनला स्पर्श केला. त्यामुळे हा धावपटू सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. टकरने ४०० मीटरची अडथळा शर्यत ४९.३८ सेकंदांत पूर्ण केली. त्याने आपल्या संघाच्या राॅबर्ट ग्रँटला मागे टाकले. त्यामुळे ग्रँटला ही रेस ४९.४७ सेकंदांत पूर्ण करता आली.

X