आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Champion Bagpiper\'s Fingers Turned BLACK And Had To Be Amputated After He Contracted Gangrene Which Nearly Killed Him

पायात होता छोटासा डाग, मग अचानक बिघडली तब्येत अन् काळे पडू लागले हात-पाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ही कहाणी 'सोशल व्हायरल सिरीज'अंतर्गत आहे. जगभरात सोशल मीडियावर अशा स्टोरीज व्हायरल झालेल्या आहेत, ज्या तुम्हाला माहिती असाव्यात.)


डुंगानन - आयर्लंडमधील रहिवासी एका म्युझिशियनचे आयुष्य त्याच्या पायावर पडलेल्या एका छोट्याशा डागामुळे पूर्णपणे बदलले. त्या डागानंतर त्याचे दोन्ही हातही काळे पडले आणि सडायला सुरुवात झाली. यानंतर डॉक्टरांनी त्याच्या हातांची सर्व बोटे, पूर्ण डावा पाय आणि उजव्या पायातील काही भाग कापून त्याचा जीव वाचवला.

 

जीव वाचवण्यासाठी घ्यावा लागला मोठा निर्णय...
- ही स्टोरी आयर्लंडच्या डुंगाननमधील रहिवासी 33 वर्षीय म्युजिशियन एंड्रू शिलिडे यांची आहे. ते उलापूल शहरात बॅगपाइपर (एक संगीत वाद्य) शिकवायचे. 
- 6 वर्षांपूर्वी अँड्र्यूच्या डाव्या पायावर एक डाग पडला आणि हळूहळू त्यांची प्रकृती बिघडू लागली. डाग झाल्यानंतर त्यांच्या हातपायाचा रंग बदलू लागला. ते काळे पडून सडायला सुरुवात झाली.
- अँड्र्यू सांगतात की, तेव्हा माझ्या हात आणि पायात प्रचंड वेदना व्हायच्या. हे सर्व एवढे वेगाने घडत होते की, मला काही सुचतच नव्हते.
- जेव्हा डॉक्टरांना दाखवले तेव्हा त्यांनी 'सिस्टमेटिक स्क्लेरोसिस'मुळे त्यांना गँगरिन झाल्याचे सांगितले. यानंतर अनेक वर्षे त्यांच्यावर उपचारही सुरू होते, परंतु काहीच फायदा झाला नाही.
- उपचारांनंतरही आजार सतत वाढत असलेला पाहून डॉक्टरांनी कठोर निर्णय घेत गँगरिनमुळे प्रभावित अवयव कापण्यासाठी सांगितले. डॉक्टरांच्या मते, असे केल्याविना त्यांचा जीव वाचणे कठीण होते.
- अँड्र्यू आणि त्यांचे कुटुंबाकडून परमिशन मिळाल्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करत त्यांच्या हातांची दोन्ही मनगटे, पूर्ण डावा पाय आणि अर्धा उजवा पाय कापून वेगळा केला. रिकव्हरीसाठी त्यांना 8 महिने रुग्णालयात राहावे लागले.

 

पुन्हा वाजवू लागले बॅगपायपर

- अँड्र्यू सांगतात की, मला जेव्हा या आजाराबद्दल कळले तेव्हा मी प्रचंड हादरलो होतो. कारण बॅगपायपरच माझे आयुष्य होते आणि माझ्या कमाईचे दुसरे साधनही तेच होते. मला वाटत होते की, यापुढे आता वाजवताच येणार नाही.
- सर्जरीनंतर शिलिडे पुन्हा आपल्या घरी परतले. तिथे त्यांनी पुन्हा एकदा बॅगपाइपर वाजवणे सुरू केले. तथापि, आता ते हे काम एका इलेक्ट्रिक इंस्ट्रूमेंटच्या मदतीने करतात.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos व Video...  

 

 

बातम्या आणखी आहेत...