Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | chanakya niti about friendship for happy life

जो मित्र समोर आपले कौतुक आणि पाठीमागे निंदा करतो, त्याला लगेच सोडून द्यावे

रिलिजन डेस्क, | Update - Jul 14, 2019, 12:10 AM IST

चाणक्य नीतीच्या या गोष्टी लक्षात ठेवल्यास आपण विविध अडचणींपासून दूर राहू शकतो

 • chanakya niti about friendship for happy life

  सर्वांच्या आयुष्यात मित्राचे महत्त्व जास्त असते. हे एक असे नाते असते ज्याची आपण स्वतः निवड करतो. आपणच ठरवतो की आपला मित्र कोण असेल. आचार्य चाणक्यांनी मित्रांशी संबंधित एक नीती सांगितली आह. या नितीकडे आपण विशेष लक्ष दिल्यास विविध अडचणींपासून दूर राहू शकतो.


  चाणक्य नीतीच्या दुसऱ्या अध्यायाच्या पाचव्या श्लोकामध्ये लिहिले आहे की...
  परोक्षे कार्यहन्तारं प्रत्यक्ष प्रियवादिनम्।
  वर्जयेत्तादृशं मित्रं विषकुंभम् पयोमुखम्।।

  अर्थ : या नितीमध्ये चाणक्य सांगतात की, जो मित्र आपल्यासमोर गॉड बोलतो, आपले कौतुक करतो आणि पाठीमागे निंदा करतो, काम बिघडवण्याचा प्रयत्न करतो अशा लोकांसोबत मैत्री ठेवू नये. अशा मित्रांचा लगेच त्याग करावा. असे मित्र अशा मठाप्रमाणे असतात ज्याच्या मुखावर दूध दिसते परंतु आतून विष भरलेले असते. यांची मैत्री आपल्यासाठी नुकसानदायक असते. यामुळे अशा मित्रांपासून दूर राहावे.


  चाणक्य नीतीच्या दुसऱ्या अध्यायाच्या सहाव्या श्लोकानुसार
  न विश्वसेत् कुमित्रे च मित्रे चाऽपि न विश्वसेत्।
  कदाचित् कुपितं मित्रं सर्वं गुह्यं प्रकाशयेत्।।

  अर्थ : या नितीमध्ये चाणक्य सांगतात की, कुमित्रावर आजिबात विश्वास ठेवू नये. यासोबतच ही गोष्टही लक्षात ठेवावी की, सुमित्रावरही संपूर्ण विश्वास ठेवू नये. भविष्यात त्याच्यासोबत आपला वाद झाला तर आपले सर्व रहस्य तो उघड करू शकतो.

Trending