आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 4 प्रकारे जाणून घेऊ शकता कोणताही व्यक्ती चांगला माणूस आहे की नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही व्यक्तीची पारख करण्यासाठी आचार्य चाणक्यांनी एक अचूक नीती सांगितली आहे. या नीतीमध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टींवरून एखाद्या स्त्री किंवा पुरुषाची पारख केल्यास त्या व्यक्तीशी संबंधित सर्व योग्य माहिती प्राप्त केली जाऊ शकते.


आचार्य चाणक्य सांगतात की...
यथा चतुर्भि: कनकं परीक्ष्यते निघर्षणं छेदनतापताडनै:।
तथा चतुर्भि: पुरुषं परीक्ष्यते त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा।।


या श्लोकामध्ये आचार्य चाणक्य सांगतात की, सोन्याची पारख करण्यासाठी चार गोष्टी करणे आवश्यक आहेत. सोन्याला रगडून, कापून आगीमध्ये गरम करून आणि दाबून पाहिले पाहिजे. या चार गोष्टी केल्यानंतरच शुद्ध सोन्याची पारख केली जाऊ शकते. जर सोन्यामध्ये भेसळ किंवा कमतरता असेल तर या कामांमुळे ती समोर येईल.


पहिली गोष्ट - त्यागाची भावना पहावी
कोणत्या व्यक्तीला पारखण्यासाठी सर्वात पहिले त्यांची त्याग क्षमता पाहावी. जर एखादा व्यक्ती इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करत असेल तर निश्चितच तो श्रेष्ठ व्यक्ती असतो. ज्या लोकांच्या मनामध्ये त्यागाची भावना नसते ते कधीही श्रेष्ठ व्यक्ती बनू शकत नाहीत. त्यागाच्या भावनेशिवाय व्यक्ती कोणाचेही भले करू शकत नाही.


दुसरी गोष्ट - चारित्र्य पाहावे
व्यक्तीला पारखण्याच्या प्रक्रियेत दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे चारित्र्य पाहावे. ज्या लोकांचे चारित्र्य स्वच्छ असते म्हणजे वाईट गोष्टींपासून दूर राहणारे आणि इतरांबद्दल मनात वाईट विचार ठेवत नाहीत असे लोक श्रेष्ठ असतात. जर एखाद्या व्यक्तीचे चरित्र दुषित आणि विचार पवित्र नसतील तर अशा व्यक्तीपासून नेहमी दूर राहवे.


पुढील स्लाईड्समध्ये श्लोकाच्या उर्वरित अर्थावरून जाणून घ्या, एखाद्या व्यक्तीला कशाप्रकारे पारखावे....

बातम्या आणखी आहेत...