Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Chanakya Niti And Panchtantra Story For Better Life

कोणतेही काम करण्यापूर्वी या 3 गोष्टींचा विचार अवश्य करावा, सुखी राहाल

रिलिजन डेस्क | Update - Aug 10, 2018, 11:47 AM IST

आचार्य चाणक्य यांचेच एक नाव विष्णू शर्मा आहे. यांनी विविध ग्रंथांची रचना केली आहे. यांनीच लिहिलेला एक ग्रंथ म्हणजे पंचतं

 • Chanakya Niti And Panchtantra Story For Better Life

  आचार्य चाणक्य यांचेच एक नाव विष्णू शर्मा आहे. यांनी विविध ग्रंथांची रचना केली आहे. यांनीच लिहिलेला एक ग्रंथ म्हणजे पंचतंत्र. यामध्ये अशा अनेक नितींविषयी सांगितले आहे, ज्यांचे पालन केल्याने आपल्या चांगल्या वाईट कामाची ओळख सहज केली जाऊ शकते. पंचतंत्रची एक नीति अशा तीन कामांविषयी सांगते, जी कामे कोणत्याच मनुष्याने चुकूनही करायला नको. कोणतेही काम करण्यापूर्वी या तीन गोष्टींचा विचार केल्यास कधीही चुकीचे काम करणार नाहीत आणि जीवनात आपल्या कोणत्याही कामामुळे दुःख पदरी पडणार नाही.


  मनुष्यासाठी वर्जित सांगितलले आहे हे 3 काम...
  अयशः प्राप्यते येन येन चापगतिर्भवेत्।
  स्वर्गाच्च भ्रंश्यते येन न तत्कर्म समाचरते।।


  1. जे काम केल्यावर अपमान होतो.
  मनुष्याच्या जीवनात मान-सन्मानाला बहुमूल्य मानले जाते. सम्मानहीन मनुष्य जिवंत असल्यावर देखील मेल्या समान मानला जातो. मनुष्याने असे कोणतेच कामी करु नये ज्यामुळे त्यांच्या सन्मानावर संकट येईल आणि ज्यामुळे तुमचा अपमान होईल. खोटे बोलणे, विनाकारण खुप जास्त क्रोधीत होणे, दूस-यांची निंदा करणे अशा कारणांमुळे मनुष्याला अपमानीच व्हाले लागु शकते. असे केल्याने फक्त त्यालाच नाही तर त्याच्या कुटूंबाला देखील अपमानाचा सामना करावा लागतो. यामुळे मनुष्याने या सर्व गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन कामे...

 • Chanakya Niti And Panchtantra Story For Better Life

  2. जे काम केल्याने वाईट अवस्था होईल
  अनेक वेळा मनुष्य लालचीपणा किंवा ईर्ष्येच्या भावने काही असे काम करतो, जे त्यांनी कदापी करु नये. असा मनुष्य योग्य-अयोग्यचा निर्णय करु शकत नाही. काही विचार न करता चुकीचे काम देखील करु शकतो. ज्यामुळे नंतर त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यामुळे अशी कोणतीच चुक करु नका ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभर पाश्चाताप होईल आणि अडचणींचा सामाना करावा लागेल.

 • Chanakya Niti And Panchtantra Story For Better Life

  3. ज्या कामामुळे नरक प्राप्ति होईल
  पुराण आणि ग्रंथांमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहे ज्या करणे किंवा न करण्याने स्वर्ग किंवा नरक प्राप्ति होते. गुरुचा अपमान करणे, आई-वडिलांसोबत वाईट व्यवहार करणे, ब्राम्हणांचा अपमान करणे, परस्त्रीवर वाईट नजर टाकणे असे अनेक कामे केल्याने मनुष्य पापाचा भागीदार बनतो. त्याला नरक यातना झेलाव्या लागतात. ज्या गोष्टी अधर्म मानल्या जातात अशा गोष्टी मनुष्याने कधीच करु नये. असे केल्याने त्याला धरतीवच नरकांसमान दुखांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे मनुष्याने आपले मन नेहमी पुण्य कर्मांमध्येच ठेवले पाहिजे आणि पाप करण्यापासून दूर राहिले पाहिजे.

Trending