आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाणक्य नीती : जो पिता आपल्या पुत्र आणि पुत्रीला चांगले संस्कार देतो तोच बुद्धिमान असतो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात सुख, शांती आणि यश हवे असल्यास आचार्य चाणक्यांच्या नीती आपल्या कामी येऊ शकतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतींच्या बळावरच चंद्रगुप्त सारख्या सामान्य बालकाला अखंड भारताचे सम्राट बनवले होते. चाणक्य यांनी नीतीशास्त्रची रचना केली होती. या शास्त्रानुसार अशी एक नीती जाणून घ्या, ज्याकडे प्रत्येक वडिलाने अवश्य लक्ष द्यावे....


चाणक्य म्हणतात
पुत्राश्च विविधै: शीलैर्नियोज्या: सततम् बुधै:।
नीतिज्ञा शीलसंपन्नां भवन्ति कुलपूजिता:।।


> ही चाणक्य नीतीच्या दुसऱ्या अध्यायातील 10वी नीती आहे. या नीतीनुसार जो पिता आपल्या पुत्र आणि पुत्रीला सर्वप्रकारच्या शुभ गुण आणि संस्काराचे शिक्षण देतो, तोच बुद्धिवान आहे. नीतीवान आणि शालीन लोकांचेच कुळामध्ये पूजन होते.


> चाणक्य म्हणतात, मुलांच्या पालन-पोषणमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, कारण अपत्याच्या चुकीच्या कामामुळे पित्याला समाजात अपमानित व्हावे लागते. अपत्याने चांगले काम केले तरच त्याला स्वतःला आणि त्याच्या पित्याला मान-सन्मान प्राप्त होतो. संस्कारी मुलांची कुळामध्ये पूजा होते. जे लोक या नीतीचे पालन करतात त्यांच्या घरामध्ये नेहमी सुख-शांती कायम राहते.