आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे लोक मुर्खांना जास्त महत्त्व देतात, त्यांना कधीही यश मिळत नाही, नेहमी दुःखी राहतात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळी भारत वेगवेगळ्या खंडांमध्ये विभागलेला होता. त्यावेळी आचार्य चाणक्य यांनी संपूर्ण भारताला एकत्र करून चंद्रगुप्त मौर्यला अखंड भारताचे सम्राट बनवले. चाणक्य यांनी नीती ग्रंथाची रचनाही केली आहे. चाणक्य नीती नावाने हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या नीती शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या नीतींचे पालन केल्यास आपण विविध अडचणींपासून दूर राहून यश प्राप्त करू शकतो. येथे जाणून घ्या, मूर्ख लोकांविषयी एक नीती...

आचार्य चाणक्य म्हणतात.... 

मूर्खा यत्र न पूज्यन्ते धान्यं यत्र सुसन्चितम्। 

दाम्पत्ये कलहो नास्ति तत्र श्री: स्वयमागता।। 

  • आचार्य चाणक्य यांच्यानुसार, ज्या घरामध्ये मुर्खांचा नाही तर, बुद्धिमान लोकांचा योग्य मन-सन्मान केला जातो, त्याठिकाणी महालक्ष्मी सदैव निवास करते. ज्या घरामध्ये पर्याप्त अन्न असते कोणीही उपाशी झोपत नाही, त्या घरामध्ये महालक्ष्मी सदैव निवास करते. ज्या घरामध्ये घरी आलेल्या पाहुण्यांचे योग्य स्वागत केले जाते, मांसाहार केला जात नाही, त्याठिकाणी महालक्ष्मी सदैव निवास करते.ज्या घरामध्ये पती-पत्नी सदैव प्रेमाने राहतात, घरात कलह करत नाहीत त्याठिकाणी महालक्ष्मी निवास करते.

  • जे लोक मूर्खांची पूजा करतात, म्हणजेच मुर्खांना जास्त महत्त्व देतात त्यांची सेवा करतात ते कधीही यशस्वी होत नाहीत. नेहमी दुःखी राहतात. ज्याठिकाणी धन-धान्याचा अपमान केला जातो, संग्रह केला जात नाही, पती-पत्नी नेहमी भांडत राहतात अशा ठिकाणी देवी लक्ष्मी थांबत नाही. यामुळे मूर्ख लोकांसोबत राहू नये.
बातम्या आणखी आहेत...