आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीवनात या 3 गोष्टी होत असल्यास समजावे, सुरु होणार आहे वाईट काळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीला भाग्याची साथ मिळत आहे का नाही, हे त्याच्या वर्तमान परिस्थितीवरून समजू शकते. आचार्य चाणक्यांनी एका नितीमध्ये सांगितले आहे की, जीवनात या 3 गोष्टी घडू लागल्यास समजावे की व्यक्तीला भाग्याची साथ मिळत नाही आणि त्याचा वाईट काळ सुरु झाला आहे. अशा स्थितीमध्ये धैर्य सोडू नये. शांततेने काम करावे. येथे जाणून घ्या, या तीन परिस्थिती कोणकोणत्या आहेत...

  • हा आहे चाणक्य नितीमधील आठव्या अध्यायातील नववा श्लोक...

वृद्धकाले मृता भार्या बन्धुहस्ते गतं धनम्।
भोजनं च पराधीनं त्रय: पुंसां विडम्बना:।


या श्लोकामध्ये आचार्य सांगतात की, एखाद्या पुरुषाची पत्नी तरुणपणात देवाघरी गेली तर तो दुसरे लग्न करू शकतो, परंतु वृद्धावस्थेत पत्नी नसणे हे मोठे दुर्भाग्य आहे. कोणत्याही व्यक्तीसाठी म्हातारपणात पत्नी जवळ असणे खूप आवश्यक आहे. म्हातारपणात पत्नी मेल्यास तो एकटा व्यक्ती योग्य पद्धतीने जीवन जगू शकत नाही. याच कारणामुळे वृद्धावस्थेत पत्नी जवळ नसणे ही मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. ही नीती ठीक अशाच प्रकारे स्त्रियांना लागू पडते.

  • दुसरी गोष्ट

आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की, जर एखादा पुरुष दुसर्‍या व्यक्तीवर अवलंबून असेल, त्याने दिलेले अन्न खात असेल, त्याच्या अधीन असेल तर अशा पुरुषाचे जीवन नरकासमान आहे. पुरुषाने नेहमी कर्मशील राहावे. जो पुरुष इतरांवर अवलंबून असतो, तो कधीही स्वतंत्रपणे काम करू शकत नाही. त्याला प्रत्येक कामासाठी इतरांची मदत घ्यावी लागते. अशा परिस्थितीपासून दूर राहण्याचा पुरुषाने प्रयत्न करावा, अन्यथा त्या व्यक्तीचे नशीब खराब आहे असे समजावे.

  • तिसरी गोष्ट

एखाद्या व्यक्तीचे सर्व धन त्याच्या शत्रूंच्या हाती पडले तर तो निर्धन होतो. स्वतःच्या कष्टाने कमावलेला पैसा, शत्रूच्या हाती पडल्यास व्यक्तीला दुहेरी संकटाचा सामना करावा लागतो. शत्रू त्याच्या धनाचा उपयोग त्याच्याच विरोधात करू शकतात. अशा परिस्थितीमुळे तो स्वतःचा उदरनिर्वाह योग्य पद्धतीने करण्यास सक्षम राहत नाही.

बातम्या आणखी आहेत...