आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आचार्य चाणक्यांनी ही 6 कामे सांगितली आहेत अशुभ, यामुळे महालक्ष्मी सोडून जाते घर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आचार्य चाणक्यांनी एका नितीमध्ये सांगितले आहे की, कोणत्या कामांमुळे महालक्ष्मी नाराज होते. ज्या व्यक्तीला महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याची आणि धनवान होण्याची इच्छा आहे त्याने या कामांपासून दूर राहावे..


श्लोक
कुचैलिनं दन्तमलोपधारिणं ब्रह्वाशिनं निष्ठुरवाक्यभाषिणम्।
सूर्योदये ह्यस्तमयेपि शायिनं विमुञ्चति श्रीरपि चक्रपाणिम्।।


या दोन वेळेला झोपू नये
सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन वेळा हिंदू धर्मामध्ये शुभ, मंगलकारी आणि दैवीय कृपा प्राप्त करून देणाऱ्या मानल्या गेल्या आहेत. सुर्योदयामध्ये लक्ष्मीपती विष्णूचा वास मानण्यात आला असून संध्याकाळची वेळ देवी लक्ष्मीची भ्रमण वेळ मानण्यात आली आहे. यामुळे या दोन्ही वेळेला झोपल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही आणि घरातिक सुख-समृद्धी कमी होऊ लागते.


मळालेले वस्त्र परिधान करणारा
गरुड पुराणानुसार मळालेले म्हणजे अस्वच्छ कपडे परिधान करणाऱ्या व्यक्तीचा देवी लक्ष्मी त्याग करते. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे, तुम्ही स्वच्छ कपडे परिधान केल्यास लोक तुम्हाला भेटताना संकोच बाळगणार नाहीत. जर तुम्ही व्यापार करत असाल आणि ओळखी वाढल्यामुळे तुमचा व्यापार वाढेल. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची स्वच्छता पाहून तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. याउलट तुम्ही अस्वच्छ राहिल्यास लोक तुमच्यापासून दूर राहतील.


दात अस्वच्छ ठेवणारा
ज्या लोकांचे दात अस्वच्छ असतात अशा लोकांचा देवी लक्ष्मी त्याग करते. येथे दात अस्वच्छ ठेवण्याचा थेट अर्थ तुमच्या स्वभाव आणि आरोग्याशी संबंधित आहे. जे लोक दात स्वच्छ ठेवत नाहीत, ते कोणतेही काम पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणे करू शकत नाहीत. यामुळे त्यांचा आळशी स्वभाव दिसून येतो. आळसामुळे हे लोक दिलेली जबाबदारी पार पाडू शकत नाहीत. यामुळे देवी लक्ष्मी अशा लोकांचा त्याग करते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन कामे...

बातम्या आणखी आहेत...