Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | chanakya niti full in Marathi

सुखी आणि यशस्वी आयुष्य हवे असल्यास चाणक्यांच्या या 6 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

रिलिजन डेस्क | Update - Jan 08, 2019, 12:03 AM IST

चाणक्य नीती : नेहमी लक्षात ठेवावे की सध्याचे दिवस सुखाचे आहेत की दुःखाचे, आपले शत्रू कोण आहेत आणि मित्र

 • chanakya niti full in Marathi

  कोणत्याही कामाच्या सुरुवातीला आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या काही खास गोष्टींकडे लक्ष दिल्यास आपण यशस्वी होऊ शकतो. आचार्य चाणक्यांनी एका नितीमध्ये 6 अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांचे पालन केल्यास आपण विविध अडचणींपासून दूर राहून यश प्राप्त करू शकतो. येथे जाणून घ्या, या गोष्टी कोणकोणत्या आहेत...


  पहिली गोष्ट - सध्याचा काळ कसा आहे
  समजदार व्यक्तीला माहिती हवे की वर्तमान काळ कसा आहे? सध्या दिवस सुखाचे आहेत का दुःखाचे? या आधारे योजना आखून तो यशस्वी होऊ शकतो.


  दुसरी गोष्ट - आपले मित्र कोण आहेत आणि शत्रू
  आपले खरे मित्र कोण आहेत, हे आपल्याला माहिती पाहिजे. कारण अनेक परिस्थितीमध्ये मित्राच्या वेशामध्ये शत्रू आपल्या जवळ येतात. त्यापासून सावध राहणे आवश्यक आहे.


  तिसरी गोष्ट - आपण कोणत्या ठिकाणी राहतो
  प्रत्येक व्यक्तीला माहिती पाहिजे की, तो ज्या ठिकाणी राहतो ती जागा कशी आहे? तेथील वातावरण कसे आहे?


  चौथी गोष्ट - आपल्या उत्पन्न आणि खर्चाची माहिती
  स्वतःच्या उत्पन्नाची व खर्चाची सर्व कल्पना असणे आवश्यक आहे. उत्पन्नानुसार व्यक्तीने खर्च करणे अपेक्षित आहे.


  पाचवी गोष्ट - आपली योग्यता
  समजदार व्यक्तीला तो किती योग्य आहे आणि कोणते काम कुशलतेने करू शकतो, हे माहिती असणे आवश्यक आहे. जे काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो, तेच काम करणे योग्य आहे.


  सहावी गोष्ट - आपल्या गुरु आणि स्वामीला काय अपेक्षित आहे
  प्रत्येक व्यक्तीला त्याचा गुरु किंवा स्वामी कोण आहे आणि त्यांना आपल्याकडून कोणते काम करवून घ्यायचे आहे हे माहिती असावे. आपण आपल्या स्वामी आणि गुरूंच्या आज्ञांचे पालन केल्यास विविध अडचणींपासून दूर राहू शकतो.

Trending