Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | chanakya niti full in Marathi

आपल्याला केव्हा इतरांच्या चुकीच्या कामाची शिक्षा मिळते, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे 

रिलिजन डेस्क | Update - Apr 13, 2019, 12:01 AM IST

पत्नी सासरच्या लोकांकडे लक्ष देत नसेल तर यांची शिक्षा पतीला मिळते, अशाचप्रकारे पतीच्या चुकीच्या कामाची शिक्षा पत्नीला मि

 • chanakya niti full in Marathi

  आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतींमध्ये सुखी आणि यशस्वी जीवनाचे सूत्र सांगितले आहेत. या सूत्रांचे पालन केल्यास आपण विविध समस्यांपासून दूर राहू शकतो. चाणक्यांनी एका नीतीमध्ये सांगितले आहे की, आपल्या कोणत्या परिस्थितीमध्ये इतरांमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो...


  आचार्य चाणक्य सांगतात की...
  राजा राष्ट्रकृतं पापं राज्ञ: पापं पुरोहित:।
  भर्ता च स्त्रीकृतं पापं शिष्यपापं गुरुस्तथा।।

  चाणक्यांनी या श्लोकामध्ये सांगितले आहे की, कोणत्या व्यक्तीच्या पापाचे फळ कोणाला भोगावे लागते.


  जर जोडीदार चुकीचे काम करत असेल तर...
  आचार्य चाणक्य सांगतात की, लग्नानंतर जर एखादी पत्नी चुकीचे काम करते, सासरी सर्वांकडे दुर्लक्ष करते, आपल्या कर्तव्यांचे पालन योग्य पद्धतीने करत नसेल तर अशा कर्मांची शिक्षा पतीला भोगावी लागते. ठीक अशाचप्रकारे जर एखादा पती चुकीचे काम करत असेल तर त्याचे फळ पत्नीला भोगावे लागते. त्यामुळे पती आणि पत्नी, दोघांनीही एकमेकांचे उत्तम सल्लागार व्हावे. जोडीदाराला चुकीचे काम करण्यापासून दूर ठेवावे.


  राजाच्या चुकीच्या कामाला जबाबदार असतात मंत्री, पुरोहित आणि सल्लागार...
  मंत्री किंवा सल्लागार आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नसतील, राजाला योग्य-आयोग्य कार्यांची माहिती देत नसतील आणि योग्य सल्लाही देत नसतील तर राजाच्या चुकीच्या कार्यांना जबाबदार मंत्री, सल्लगार इत्यादी लोक असतात. मंत्री, सल्लागाराचे कर्तव्य आहे की, त्यांनी राजाला योग्य सल्ला द्यावा आणि चुकीच्या कामापासून रोखावे.


  तेव्हा राजा असतो जबाबदार...
  जर एखाद्या राज्यातील किंवा देशातील जनता चुकीचे काम करत असेल तर त्याचे फळ शासन किंवा त्या देशाच्या राजाला भोगावे लागते. जेव्हा राजा आपल्या राज्याचे योग्य पद्धतीने पालन करत नाही, आपले कर्तव्य पूर्ण करत नाही तेव्हा राज्यातील जनता विरोधी होते आणि चुकीच्या कामांकडे वळते. अशा परिस्थितीमध्ये राजाच जनतेद्वारे केलेल्या चुकीच्या कामाला जबाबदार असतो.


  शिष्याच्या चुकीच्या कामाचे फळ गुरूला भोगावे लागते...
  या नीतीच्या शेवटी सांगण्यात आले आहे की, जेव्हा एखादा शिष्य अधार्मिक, चुकीच्या कार्यामध्ये लुप्त होतो, तेव्हा त्याचे फळ गुरूला भोगावे लागते. गुरुचे कर्तव्य आहे की, त्यांनी शिष्याला वाईट मार्गापासून परावृत्त आणि योग्य कामासाठी प्रवृत्त करावे. जर गुरु असे करण्यात अपयशी ठरले तर त्याचा दोष गुरुनांच लागतो.

Trending