आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्याच्या काळामध्ये स्वभावाने साध्या-सरळ असणार्या लोकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. या संदर्भात आचार्य चाणक्य सांगतात की....
अतिहि सरल नहिं होइये, देखहु जा बनमाहिं।
तरु सीधे छेदत तिनहिं, बांके तरु रहि जाहि।।
ज्या लोकांचा स्वभाव एकदम साधा आणि सरळ आहे, त्यांनी असे राहू नये कारण या गोष्टीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागू शकतो. उदाहरणार्थ जंगलामध्ये जे झाड एकदम सरळ असते सर्वात पहिले ते झाड तोडण्यात येते.
आचार्य चाणक्य म्हणतात, ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा जास्त साधा-सरळ, आणि सहज असतो त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात. अशा लोकांना दुर्बल समजले जाते. अनावश्यक स्वरुपात या लोकांना प्रताडना सहन करावी लागते.
अत्याधिक साधा-सरळ स्वभावसुद्धा मूर्खतेच्या श्रेणीत येतो. यामुळे व्यक्तीने थोडे चतुर असावे. ज्यामुळे तो जीवनात एखादे उल्लेखनीय कार्य करू शकेल. व्यक्ती स्वतःच्या हुशारीनेच स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे व्यवस्थित पालनपोषण करू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.