आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पिताना चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवल्यास नेहमी फायद्यात आणि निरोगी राहाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते आणि शरीरात पाण्याच्या योग्य स्तरामुळे पाचन तंत्र व्यवस्थित राहण्यास मदत होते. पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु काही परिस्थितींमध्ये पाण्यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते. जेवण करण्याच्या ठीक आगोदर पाणी प्यायल्यास पाचन शक्ती कमजोर होऊ शकते. आचार्य चाणक्यांनी एका नीतीमध्ये सांगितले आहे की, चुकीच्या वेळी पाणी पिणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. आचार्य चाणक्य सांगतात की...


अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम्।
भोजने चाऽमृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्।।


- या श्लोकामध्ये आचार्यांनी सांगितले आहे, की जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. जेवण केल्यानंतर जोपर्यंत अन्न पचत नाही तोपर्यंत पाणी पिणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. 


- जर एखादा व्यक्ती जेवण केल्यानंतर लगेच जास्त पाणी पीत असेल तर त्याच्या पाचन तंत्राला अन्न पचवण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. अन्न योग्यरीत्या पचले नाही तर शरीराला पाहिजे तेवढी उर्जा प्राप्त होऊ शकणार नाही. 


- अपचनाच्या स्थितीमुळे पोटाचे आजार होण्याची शक्यता वाढते. जेवण केल्यानंतर लगेच भरपूर पाणी प्यायल्यास ते विषाप्रमाणे कार्य करते. आपण जेवणाच्या मध्ये थोडे-थोडे पाणी पिऊ शकतो. परंतु भरपूर पाणी पिणे नुकसानदायक ठरू शकते.

बातम्या आणखी आहेत...