चाणक्य नीती / आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये इतरांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो

आचार्य चाणक्यानुसार शिष्याने एखादे चुकीचे काम केल्यास त्याचे वाईट फळ गुरूला भोगावे लागते

Dec 01,2019 12:10:00 AM IST

आचार्य चाणक्य महान नीतिकार होते. आचार्य चाणक्य द्वारे रचित चाणक्य नीती ग्रंथामध्ये सुखी आणि यशस्वी जीवनाचे सूत्र सांगितले आहेत. या सूत्रांचे पालन केल्यास आपण विविध समस्यांपासून दूर राहू शकतो. चाणक्यांनी एका नीतीमध्ये सांगितले आहे की, आपल्या कोणत्या परिस्थितीमध्ये इतरांमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो...


आचार्य चाणक्य सांगतात की...

राजा राष्ट्रकृतं पापं राज्ञ: पापं पुरोहित:।

भर्ता च स्त्रीकृतं पापं शिष्यपापं गुरुस्तथा।।

  • जर एखाद्या राज्यातील किंवा देशातील जनता चुकीचे काम करत असेल तर त्याचे फळ शासन किंवा त्या देशाच्या राजाला भोगावे लागते. जेव्हा राजा आपल्या राज्याचे योग्य पद्धतीने पालन करत नाही, आपले कर्तव्य पूर्ण करत नाही तेव्हा राज्यातील जनता विरोधी होते आणि चुकीच्या कामांकडे वळते. अशा परिस्थितीमध्ये राजाच जनतेद्वारे केलेल्या चुकीच्या कामाला जबाबदार असतो.
  • मंत्री किंवा सल्लागार आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नसतील, राजाला योग्य-आयोग्य कार्यांची माहिती देत नसतील आणि योग्य सल्लाही देत नसतील तर राजाच्या चुकीच्या कार्यांना जबाबदार मंत्री, सल्लगार इत्यादी लोक असतात. मंत्री, सल्लागाराचे कर्तव्य आहे की, त्यांनी राजाला योग्य सल्ला द्यावा आणि चुकीच्या कामापासून रोखावे.
  • लग्नानंतर जर एखादी पत्नी चुकीचे काम करते, सासरी सर्वांकडे दुर्लक्ष करते, आपल्या कर्तव्यांचे पालन योग्य पद्धतीने करत नसेल तर अशा कर्मांची शिक्षा पतीला भोगावी लागते. ठीक अशाचप्रकारे जर एखादा पती चुकीचे काम करत असेल तर त्याचे फळ पत्नीला भोगावे लागते. त्यामुळे पती आणि पत्नी, दोघांनीही एकमेकांचे उत्तम सल्लागार व्हावे. जोडीदाराला चुकीचे काम करण्यापासून दूर ठेवावे.
  • या नीतीच्या शेवटी सांगण्यात आले आहे की, जेव्हा एखादा शिष्य अधार्मिक, चुकीच्या कार्यामध्ये लुप्त होतो, तेव्हा त्याचे फळ गुरूला भोगावे लागते. गुरुचे कर्तव्य आहे की, त्यांनी शिष्याला वाईट मार्गापासून परावृत्त आणि योग्य कामासाठी प्रवृत्त करावे. जर गुरु असे करण्यात अपयशी ठरले तर त्याचा दोष गुरुनांच लागतो.
X