आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : अजय देवगण आणि नीरज पांडेने आतापर्यंत सोबत काम केले नाही, मात्र आता ते 'चाणक्य' च्या जीवनावर आधारित चित्रपटात सोबत काम करत आहेत. या चित्रपटाची घोषणा त्यांनी गेल्या वर्षी केली होती. अजय यात चाणक्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट दोन भागात बनवण्याचा विचार दोघे करत असल्याचे ऐकले आहे. मात्र अजून यावर निर्णय घेतला नाही आणि घोषणाही केली नाही.
चित्रपट दोन भागात बनवण्याचे कारण...
- नीरज बऱ्याच दिवसांपासून चाणक्यवर संशोधन करत आहे. चाण्क्यची कथा चांगली असण्याबरोबरच मोठी आहे, असे त्याला वाटते.
- त्यांच्या जीवनाविषयी अशा अनेक घटना ज्या लोकांना माहीत नाही त्यादेखील यात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
- निर्माते त्यांच्या जीवनातील वेगवेगळे पैलू दाखवू इच्छित आहेत. त्यामुळे हे सर्व एका चित्रपटात दाखवणे अवघड जाईल, असे त्यांना वाटते.
लूकमध्ये करावा लागेल बदल...
अजयला या चित्रपटाच्या लूकसाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. चित्रपट निर्माते कदाचित पुढच्या वर्षी यावर काम सुरू करतील होईल. अजयने आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये कधीच टक्कल केले नाही. त्याने जर टक्कल केले तर तो बाकीच्या चित्रपटात कसे काम करणार? त्यामुळे तो यासाठी प्रोस्थेटिकचा वापर करू शकतो असे बोलले जात आहे.
- अर्धे टक्क्ल करावे लागेल
- नाक आणि चेहऱ्यावर प्रोस्थेटिकचा वापर करावा लागेल
- वजन कमी करावे लागेल.
पाच चित्रपट करत साकारणार चाणक्य...
हा चित्रपट करण्यासाठी मी उत्सुक आहे, लवकरच यावर काम करणार असल्याचे अजय म्हणाला होता. सध्या अजय खूपच व्यग्र आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त अजयकडे 'तानाजी', 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया', 'आरआरआर', 'तुर्रम खान' आणि फुटबॉल कोच सईद अब्दुल रहीम यांचा बायोपिक आहे. या सर्व चित्रपटांमध्ये तो तानाजीसाठी कसा वेळ काढेल हे पाहणे मजेदार ठरेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.