आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही, फ्रिजसारख्या वस्तू 10% पर्यंत महाग हाेण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  भारतात टीव्ही, फ्रिज, एसी, मोबाइल फोन, वॉशिंग मशीन आणि किचन अप्लायन्सेससारख्या टिकाऊ ग्राहकोपयोगी सामग्रीच्या किमती ३ ते १० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. कंपन्यांनी ऑक्टोबरमध्येच किमती वाढवण्याचे ठरवले होते. मात्र, सणामुळे निर्णय टाळला. तीन मोठे ब्रँड एलजी, सॅमसंग व सोनीने आपल्या उत्पादनांच्या सामान्य विक्री मूल्यावर १०% पर्यंत सवलत दिली जाणारी मुदत याआधीच मागे घेतली आहे. श्याओमी, हायर, सीमेन्स व बॉशसारख्या कंपन्याही उत्पादनांच्या किमती वाढवत आहेत.  


कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स व अप्लायन्सेस तयार करणाऱ्या कंपन्यांची संघटना सियमाचे अध्यक्ष कमल नंदी यांच्यानुसार, काही कंपन्यांनी सप्टेंबरमध्ये किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याची अाता अंमलबजावणी होईल. नंदी गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड आहेत. त्यांनी सांगितले की, कंपन्यांनी ऑनलाइन विक्रीत मोठ्या सवलतीचा सामना करण्यासाठी ऑफलाइन विक्रेत्यांना काही मदत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, किंमत सध्याच्या स्तरावर कायम ठेवणे शक्य नाही.  


उद्योगाच्या प्रतिनिधींनुसार मोठ्या कंपन्या सर्वसाधारणपणे दिवाळीत ऑफलाइन रिटेलर्सना मदत करतात. मात्र, हे कधीही या वर्षी प्रमाणे १० टक्क्यांएवढी जास्त राहिली नाही. बहुतांश मदत प्रीमियम रेंजसाठी दिली जाते. कंपन्या या रेंजमध्ये येणाऱ्या उत्पादनांच्या किमती सर्वात जास्त वाढवतील.  


रुपया कमकुवत झाल्यामुळे  श्याअोमीने आठवडाभरापूर्वी आपल्या टीव्हीच्या किमती २ हजार रुपयांनी वाढवल्या आहेत.  सीमेन्स व बाॅशची उत्पादने बीएसएच हाऊसहोल्ड अप्लायन्सेस विकते. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गुंजन श्रीवास्तव यांनी सांगितले की, कंपनी किंमत वाढवण्यावर विचार करत आहे. हायर इंडियाचे अध्यक्ष एरिक ब्रेगेंजा यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीने सणात किमती वाढवण्याचा निर्णय टाळला होता. गेल्या आठवड्यात यामध्ये ५%-८% पर्यंत वाढ केली आहे.

 
कंपन्यांच्या नफ्यावर दबाव  
गेल्या काही दिवसांत रुपया बळकट झाला आहे आणि कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतही स्थिरता आली आहे. असे असताना कंपन्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या नफ्यावर दबाव आहे. त्यांनी आपल्या उत्पादनांची किंमत एक डॉलरच्या ६८.५ रुपये बेंचमार्क किंमत ठरवत निश्चित केली होती.  

 

सणासुदीत विक्री १२-१५% पर्यंत वाढली  
दिवाळीआधी सियमाने या वर्षी सणात विक्री १०% पर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तयार करणाऱ्या कंपन्यांची विक्री १२-१५ टक्के पर्यंत वाढल्याची माहिती दिली आहे. असे असले तरी केरळचा पूर, फ्लिपकार्ट व अॅमेझॉनसारख्या कंपन्यांनी नवरात्र-दिवाळीत सवलत दिल्यामुळे मागणीवर निश्चित परिणाम झाला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...