आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम सुरू असलेली घरे, फ्लॅट 10% पर्यंत स्वस्त होण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  एनबीएफसीमध्ये नगदीची समस्या आता बांधकाम विकासकांवर भारी पडताना दिसत आहे. या क्षेत्रात अलीकडच्या काळातच सुधारणा दिसत होती. मात्र, आता या अडचणीमुळे यात पुन्हा मंदी येण्याची शक्यता वाढली आहे. वास्तविक अनुत्पादित कर्जाचे (एनपीए) ओझे जास्त असल्यामुळे बँका विकासकांना कर्ज देण्यात टाळाटाळ करत आहेत.  त्यामुळे  विकासकांनी  एनबीएफसीकडे मोर्चा वळवला होता. 


मागील महिन्यात आयएसअँडएफएसने डिफॉल्ट केल्यानंतर या क्षेत्राला म्युच्युअल फंड आणि  बँकांच्या वतीने पैसे मिळणे कमी झाले आहे. या संकटामुळे  बांधकाम सुरू असलेल्या  घरे, फ्लॅटचे दर पाच ते दहा टक्क्यांनी कमी  होण्याची शक्यता आहे, ही ग्राहकांच्या दृष्टीने फायद्याची बाब आहे.  अॅनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट्सचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले की, एनबीएफसी सध्या स्वत:च संघर्ष करत आहे. त्यामुळे विकासकांना त्यांच्या वतीने देण्यात येणारे कर्ज कमी झाले आहे. सप्टेंबरपर्यंत ९ महिन्यांत फ्लॅटची विक्री ८ टक्के, तर नवीन प्रकल्पातील लाँचिंग १८ टक्के वाढली आहे. २०१६ मध्ये नोटबंदी आणि २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर विक्रीत सुधारणा होणार असल्याचे संकेत मानले जात होते. मात्र, सध्या मध्यम कालावधीत विकासावर परिणाम होण्याची शक्यता आहे.  


जेएम फायनान्शियल लिमिटेडचे अॅनालिस्ट अभिषेक आनंद यांच्या मते आधीच उशीर झालेल्या गृह प्रकल्पावर याचा सर्वाधिक परिणाम होईल. २०१४ ते २०१८ पर्यंत एनबीएफसीच्या वतीने रिअल इस्टेट कंपन्यांचे कर्ज वार्षिक ४५ टक्क्यांच्या दराने वाढले आहे. या दरम्यान रिअल्टी कंपन्यांच्या बँक कर्जात ४.७ टक्क्यांच्या दराने वाढ झाली आहे. अॅनारॉकनुसार ४.६४ लाख कोटी रुपयांच्या गृह प्रकल्पांचे काम सध्या सुरू आहे.  


प्रॉप इक्विटी कन्सल्टन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) समीर जसूजा यांच्या मते बांधकाम सुरू असलेल्या गृह प्रकल्पांचे दर ५ ते १० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात काही प्रमाणात अधिग्रहणदेखील होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात ऑबेरॉय रिअल्टीने छोट्या विकासकांची जमीन खरेदी करण्याची घोषणा केली होती. भांडवली कमतरतेची समस्या सोडवण्यासाठी अनेक महिने लागण्याची शक्यता सीबीआरईचे एमडी गौरव कुमार यांनी व्यक्त केली आहे. या दरम्यान एनबीएफसी निवडक विकासकांनाच कर्ज देणे पसंत करेल.  
या मुळे ग्राहकांना स्वस्तात घरे मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील विक्रीत वाढ होण्याचा अंदाजही काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

 

एनएचबीने २०,००० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले  
राष्ट्रीय हाउसिंग बँक (एनएचबी)ने चालू आर्थिक वर्षात २७ ऑक्टोबरपर्यंत १९ संस्थांचे २०,००० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. यामध्ये १४ हाउसिंग फायनान्स कंपन्या आहेत. एनएचबीने सप्टेंबरमध्ये यावर्षीसाठीची आर्थिक मर्यादा २४,००० वरून वाढवून ३०,००० कोटी रुपये केली होती. एनबीएफसीच्या ४५,००० कोटी रुपयांच्या मालमत्ता खरेदी करणार असल्याचे एसबीआयने जाहीर केले आहे. 

 

बंगळुरूमध्ये विक्री न झालेली घरे २५ % घटली  

मुंबई -  (-)२%  
पुणे -    (-) १०%  
बंगळुरू - (-)२५% 
दिल्ली- एनसीआर (-)९%  
शहर - घट/वाढ  
हैदराबाद - (-)२%  
चेन्नई - (+)७%  
कोलकाता - (+)१%  
> १,९०,६५० विक्री न झालेली घरे दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वाधिक. सप्टेंबर २०१७ मध्ये ही संख्या २,०९,४३० होती.

बातम्या आणखी आहेत...