आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Chances Are That The Price Of Smartphones In India Is Expected To Increase By 5 8 Per Cent

भारतात स्मार्टफोनच्या किमतीमध्ये 5 ते 8 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  पुढील काळात फोनच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आयात शुल्कात करण्यात आलेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयात झालेली १५ टक्क्यांची घसरण यामुळे कंपन्या हा भार ग्राहकांवर टाकणार आहे. संशोधन संस्था आयडीसी इंडियाचे असोसिएट संशोधन संचालक नवकेंद्र सिंह यांनी हा दावा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हँडसेटच्या दरामध्ये पाच ते आठ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. नवकेंद्र यांनी सांगितले की, पुढील काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिव्हाइस, फुल स्क्रीन डिस्प्ले, जास्त मेमरी यांसारखी वैशिष्ट्ये असल्यामुळे स्वस्त आणि मध्यम किमतीच्या फोनची मागणी वाढणार आहे. यामध्ये एक नवीन अफोर्डेबल प्रीमियम श्रेणी तयार होत आहे.  


विशेष म्हणजे चिनी कंपन्या श्याओमी आणि रियलमी यांनी त्यांच्या काही मॉडेलचे दर आधीच वाढवले आहेत. श्याओमीने बजेट स्मार्टफोन रेडमी-६ आणि ६-ए ची किंमत वाढवली आहे. ई-कॉमर्सच्या माध्यमातून फोनची विक्री करणाऱ्या रिअलमीने दोन लोकप्रिय हँडसेटचे दर वाढवले आहेत. रिअलमी - १ ची किंमत ६,९९९ वरून वाढवून ७,९९९ रुपये झाली आहे. रिअलमी -२-के थ्री-जीबी या फोनची किंमत ८,९९० वरून वाढवून ९,४९९ रुपये झाली आहे.  

 

सप्टेंबर तिमाहीत ४.२६ कोटी स्मार्टफोन, तर ४.३१ कोटी फीचर फोनची विक्री  
आयडीसी इंडियाने गुरुवारी भारतात फोन विक्रीची आकडेवारी जाहीर केली. जुलै ते सप्टेंबरदरम्यान विक्रमी ४.२६ कोटी स्मार्टफोनची विक्री झाली. गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीच्या ३.९१ कोटींच्या तुलनेमध्ये यात ९.१% वाढ झाली. स्मार्टफोन व फीचर फोनचा बाजार पहिल्यांदाच ५०-५० च्या बरोबरीत राहिला. या तिमाहीत ४.३१ कोटी फीचर फोनची विक्री झाली आहे.   

 

तर दुसरीकडे स्मार्टफोनची विक्री कमी झाल्याचा कॅनालिस संस्थेचा दावा  
आणखी एक संशोधन संस्था कॅनालिसने भारतात सप्टेंबर तिमाहीत ४.०४ कोटी स्मार्टफोन विक्री झाली असल्याचे सांगितले होते. या संस्थेच्या मते भारतातील विक्रीत यात १.१ टक्क्यांची घसरण दिसून आली होती. अमेरिकेला मागे टाकत भारत जागतील दुसरा सर्वात मोठा स्मार्टफोन बाजार बनला असल्याचेही कॅनालिसने म्हटले होते. सप्टेंबर तिमाहीमध्ये अमेरिकेत ४ कोटी फोनची विक्री झाली.

 

२७.३% भागीदारीसह श्याओमी अव्वल  
श्याओमीने १.१७ कोटी स्मार्टफोनची विक्री केली. २७.३ टक्के बाजार शेअरसह कंपनी अव्वल स्थानी आहे. सॅमसंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्याओमीला रेडमी-५-ए, रेडमी नोट-५ प्रो, रेडमी ६/ए/प्रो सिरीजचा फायदा मिळाला. सॅमसंगच्या जे-६, जे-८ आणि नवीन जे२ ची सर्वाधिक विक्री झाली.  
 

बातम्या आणखी आहेत...